प्रस्थापित अभिनेत्रींच्या पिछेहाटीचे वर्ष
सरते वर्ष प्रस्थापित अभिनेत्रींसाठी प्रतिकूल राहिले. राणी, प्रीती झिंटा, ऐश्वर्या रॉय यासारख्या प्रस्थापित अभिनेत्रींना मागे टाकत विद्या बालन, कैतरिना कैफ, दीपिका पदुकोण व लारा दत्ता सारख्या नवोदित अभिनेत्रींनी हिट चित्रपट दिले. अभिनेत्रीच्या कामगिरीचा धावता आढावा घेऊया - कैतरिना कैफ (नमस्ते लंडन, पार्टनर, अपने, वेलकम) कैतरिनाच्या चित्रपट कारकीर्दीचा आढावा घेतल्यास एखादा अपवाद सोडल्यास बहुतेक सर्व चित्रपट हिट झाले आहेत. पदार्पणाअगोदर सलमान खानची प्रेयसी म्हणून ओळख असलेल्या कैतरिनाने बघता बघता स्वत:ची ओळख निर्माण केली. आता ती स्वत:चे निर्णय स्वतः घेते. निर्मातेही कैतरीनाचे महत्त्व ओळखून आहेत. कैतरिनानेही हिंदी संवादफेक व अभिनयात चांगलीच सुधारणा घडवून आणली आहे. ख्रिसमसच्या शुभमुहूर्तावर येणारा 'वेलकम' यशस्वी झाल्यास तिच्या याव र्षातील निर्विवाद यशावर शिक्कामोर्तब होईल. विद्या बालन (सलाम-ए-इश्क, गुरु, एकलव्य, हे बेबी, भूलभुलैया)