testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

आपली माती, आपलीच माणसं!

Gajanan GhuryeGG
विलासराव देशमुख- 'म्हाराष्ट्राचे' सर्वाधिक काळ मुख्यमंत्री ठरलेल्या विलासरावांची 'देशमुखी' संपली तरी महत्त्व काही संपलेले नाही. भलेही मुख्यमंत्रिपद गमावले तरी त्यांचे सोनियांवर असे काही गारूड केलेय की अशोकरावांच्या काठीने 'मान हलवत हलवत' या गारूड्याने नारायण राणे नावाचा सतत फुत्कार करणारा साप किमान दूर केला आहे. त्याचवेळी उद्या यदाकदाचित राज्यात आघाडीची सत्ता आली तरी मुख्यमंत्रिपदाचा 'क्लेम' पहिल्यांदा त्यांचाच असू शकतो. कारण अशोकरावांपेक्षा मोठा 'मासबेस' त्यांना नक्कीच आहे. शिवाय साडेचार वर्षाच्या आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या जोरावर सत्ता पुन्हा आली असा 'कांगावा'ही करून ते अशोकराव, नारायणराव, सुशीलकुमार, पतंगराव यांच्यासह पक्षातल्या मुख्यमंत्रिपदासाठीच्या अनेक संभाव्य, गुप्त, प्रकट दावेदारांना मागे सारून पुढे येऊ शकतात.
'प्रोव्हायडेड'- हा प्रश्न सत्ता आल्यानंतरचा आहे. त्यामुळे....

NDND
अशोक चव्हाण- अशोकरावांना 'मुख्यमंत्रिपदाची' लॉटरी अर्थातच अचानकपणे लागली असली तरी विधानसभा निवडणुकांच्या रूपाने त्यांना 'टिडीएस' भरावा लागणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्रिपदाचा आनंद मानावा की 'टिडीएस'चे दुःख करावे असा प्रश्न त्यांच्यापुढे आहे. दहा वर्षे सत्ता भोगलेल्या कॉंग्रेस आघाडीची सत्ता पुन्हा येण्याची शक्यता कमीच दिसतेय. त्यामुळे निवडणुकीत पक्षाचा पराभव झाल्यास त्याचे खापर आपल्याच भाळी फुटून पुढच्या राजकीय कारकिर्दीचे तीनतेरा वाजण्याची नौबत या शंकरराव पुत्राच्या नशिबी नाही आली म्हणजे मिळवली. बाकी विलासरावांनी जाता जाता नारायण राणे आणि अशोकरावांचाही छान 'गेम' केला.

Gajanan GhuryeGG
नारायण राणे- स्वपक्षीयांवर त्यातही प्रामुख्याने विलासरावांवर 'प्रहार' करण्यात नारायणरावांची कॉंग्रेसमधली जेवढी होती तेवढी हयात गेली. आणि या प्रहारातच शेवटचा 'प्रहार' स्वतःच्याच पायावर कुर्‍हाड मारून केला. आता निलंबित झाल्यावर काय करणार हा प्रश्नच आहे. सोनियाचरणी धाव घेऊन जुळवाजुळव केली तर हा भांडकुदळ मालवणी माणून सत्तेसाठी 'वाकला' असा प्रचार व्हायचा. बरं, माघारी येऊ नये म्हणून बाळासाहेबांचा वाघही दारापाशीच गुरगुरत बसला आहे. मध्येच हत्तीवर स्वार व्हायच्या अफवाही येतात. पण हत्तीचा मद यांच्यापाशीही स्वतंत्रपणे आहे. त्यामुळे दोन्ही हत्तींची परस्परांशी जुंपली तर वेगळेच महाभारत घडायचे. कधी कधी तर धाकट्या युवराजांच्या पक्षात जाण्याची वार्ताही कानी येते. पण 'मनसे' काहीही व्यक्त होत नाही. 'राष्ट्रवादी'त बडेबडे ह्त्ती असल्याने तिथे गेल्यास या हत्तींशीच त्यांची जुंपायची. त्यामुळे आता स्वतंत्र पक्ष काढणे हाच पर्याय सध्या तरी समोर आहे. पण त्याला कितपत यश मिळेल हे सांगणे अवघड. त्यात यांचा हत्ती कोकणात रोरावतपणे फिरेल, उर्वरित राज्याचे काय?

PRPR
आर. आर. पाटील- मुंबई बॉम्बस्फोटानंतर गेलेल्या राजकीय बळीत आर. आर. पाटील यांचे नाव आल्यानंतर 'आरार' असे दुःखोद्गार नक्कीच निघाले. कर्तृत्ववान आणि चांगली प्रतिमा असलेल्या आबांना अचानक उगाचच हिंदी बोलण्याची उबळ यावी काय नि नको ते तोंडातून निघावे काय आणि यातच त्यांचे मंत्रिपद जाते काय? सगळेच अनाकलनीय. पण चांगला 'मासबेस' असलेल्या या नेत्याची पुढची वाटचाल जोरदार असेल. म्हणूनच 'राष्ट्रवादी'ने प्रदेशाध्यक्षपद त्यांच्याकडे देऊन या मुलुखमैदान तोफेला निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मैदानात उतरवले आहे. पण प्रश्न इतकाच आहे, कॉंग्रेसच्या निष्क्रियतेचे खापर 'राष्ट्रवादी'वर फुटून सत्ता आघाडीकडे आलीच नाही तर....?





अभिनय कुलकर्णी|
२००८ या वर्षाने सरता सरता महाराष्ट्राच्या पटलावर अनेक राजकीय वादळे उठवली. या वादळांनी 'राज'सत्ता तर हादरवलीच, शिवाय अनेकांवर 'प्रहार'ही केले. रा्ज्याची 'देशमुखी' विलासरावांना सोडावी लागली आणि ती नकळत चालत चालत 'अशोकरावांच्या' गळी पडली. तिकडे 'आरार' आबांना त्यांच्याच 'पॉवरबाज' साहेबांनी थांबायला लावलं आणि 'ओबीसी' अशी नवी बाराखडी लिहू पाहणार्‍या छगनरावांच्या आणि पर्यायाने 'राष्ट्रवादी'च्या भुजांत बळ भरले. तिकडे उद्धव आणि राज यांच्या 'भाऊबंदकी' या नाटकाचा प्रयोग या वर्षीही रंगला. 'मराठी मुद्याचे'चे प्रॉपर्टी राईट्स अर्थात स्थावर हक्क आपल्याकडेच, असल्याचे सांगून 'मी मराठी, मी मराठी' हे पद दोघेही शिरा ताणून गात असल्याने हे पद आणि 'नाटकही' पुढे सरकायला तयार नाही. गोपीनाथांच्या बंडाने अनेकांच्या 'मुंड्या' त्यांच्याकडे वळाल्या. त्यातच तेही 'ओबीसी' ही नवी बाराखडी गिरवायला लागल्याने 'मिटता कमलदल' अशी अवस्था झाली होती. पण पक्षश्रेष्ठींनी समजूत काढल्यानंतर कमळाच्या पाकळ्या उमलल्या आणि सर्वत्र 'प्रमोद' जाहला. आता बघूया पुढच्या वर्षी यापैकी कोण किती महत्त्वाचा ठरतो ते? 'आफ्टरऑल' पुढच्या वर्षी अंगण आणि ओसरीतही निवडणुका आहेत, महाराजा. शड्डू ठोकून आव्हान देणार्‍या या मंडळीतील कोणाची पाठ मातीला लागणार नि कोण वरचढ ठरणार (पुढील फक्त पाच वर्षासाठी हं!) हे याच वर्षी ठरणार. मग बघूया कुणाच्या दंडाची बेटकुळी किती फुगतेय ते.



यावर अधिक वाचा :

न्यायालयाचा महत्वाचा निर्णय, पत्नीला शरीरसंबंधांसाठी नाही ...

national news
लग्न, विवाह याचा अर्थ पत्नीने पती म्हणेल तेव्हा शरीरसंबंधाला तयार राहावे असा होत नाही, ...

वृत्तवाहिनीच्या चर्चासत्रात मौलवीकडून महिला वकिलाला मारहाण

national news
एका वृत्तवाहिनीवर तिहेरी तलाकवरून सुरु असलेल्या चर्चासत्रात एका मौलवीने महिला वकिलाच्या ...

हा तर 'अमूला' राज्यात घुसवण्याचा प्रयत्न : राज ठाकरे

national news
राज्यात सुरु असलेले दूध आंदोलन हाताळण्यात सरकार अपयशी ठरले आहे. आंदोलनाबाबत माहिती ...

भयंकर: मुलाने ओ दिली नाही, वडीलाने केली हत्या

national news
उत्तर प्रदेशाच्या बस्ती जिल्ह्यात मुलाने वडिलांनी मारलेल्या हाकेला ओ दिले नाही म्हणून ...

बाळाला स्तनपान करत रॅम्प वॉक, सोशल मीडियावर जोरदार चर्चा

national news
मिआमीमधील एका फॅशन शोमध्ये मारा मार्टीन या मॉडेलने तिच्या तान्ह्या बाळाला स्तनपान करत ...