testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

क्रिकेटमध्ये भारताची ‘धोनीपछाड’

match
ND
भारतीय क्रिकेट संघासाठी सन 2008 हे चांगले गेले. भारतीय क्रिकेट संघ पाच कसोटी मालिका आणि तितक्याच एकदिवसीय मलिका यावर्षी खेळला. त्यात वर्षाच्या सुरवातीला बॉर्डर-गावस्कर मालिकेमध्ये 2-1 असा पराभव झाला. मात्र वर्षाच्या शेवटी इंग्लडविरूध्द एकदिवसीय आणि कसोटी मालिका जिंकून भारतीय संघाने शेवट गोड केला. यावर्षी अनिल कुंबळे (जम्बो), सौरभ गांगुली या वरिष्ठ खेळाडूंनी निवृत्ती स्वीकारली. दुसर्‍या बाजूला युवा खेळाडू महें‍द्रसिंह धोनी, गौतम गंभीर, जहीर खान, वीरेंद्र सहवाग, युवराजसिंह यांना जोरदार कामगिरी केली. यामुळे भारतीय क्रिकेटचा आलेख यावर्षी चढता राहिला.

कसोटी क्रिकेट: भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, इंग्लड आणि दक्षिण आफ्रिकेविरूध्द कसोटी मालिका खेळली. वर्षाच्या प्रारंभी बॉर्डर-गावस्कर मालिकेत भारताचा 2-1 असा पराभव झाला. मात्र, त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ भारतात ऑक्टोंबरमध्ये आल्यावर भारताने हिशोब चुकता केला. ही मालिका भारतीय संघाने 2-1 अशी जिंकली. सन 2008 मध्ये झालेल्या पाच मालिकेपैकी दोन भारताने जिंकल्या तर दोनमध्ये पराभव पत्करावा लागला. दक्षिण अफ्रिकेविरुध्द झालेली मालिका अर्निणीत राहिली. भारताला ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका विरुध्द पराभव पत्करावा लागला. तसेच ऑस्ट्रेलिया आणि इंग्लडविरूध्द विजयही मिळविला.

खेळाडूंचे यश-

sachin
ND
सचिन तेंडुलकर : मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्यासाठी सन 2008 हे वर्ष ‘विक्रमी’ गेले. कसोटी सामन्यातील ब्रायन लाराचा सर्वाधिक धावसंख्येचा विक्रम सचिनने 17 ऑक्टोंबर 2008 रोजी मोडला. ऑस्ट्रेलियाविरुध्दच्या सामन्यात 11953 धावा करून कसोटीत सर्वाधिक धावसंख्या करणारा खेळाडू ठरला. त्याचबरोबर 12 हजार धावाही पूर्ण केल्या. सन 2008 मध्ये सचिनने चार शतकेही ठोकली.

gautam
ND
गौतम गंभीर : गौतम गंभीरने एकदिवशीय क्रिकेटबरोबर कसोटी सामन्यातही आपण उपयुक्त खेळाडू असल्याचे सिध्द केले. गंभीरने यावर्षात तीन कसोटी शतके काढली. त्यातील दोन ऑस्ट्रेलियाविरूध्द तर एक इंग्लडविरुध्द होते. त्याचप्रमाणे ऑस्ट्रेलियाविरुध्द दिल्ली कसोटीतही गंभीरने द्विशतक फटकावले. सन 2008 या वर्षात कसोटी क्रिकेटमध्ये एक हजार धावाही त्याने पूर्ण केल्या. यामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआई) गंभीरचा समावेश 'अ' श्रेणीत केला.

virendra
ND
वीरेंद्र सहवाग : स्फोटक फलंदाज म्हणून प्रसिध्द असलेल्या वीरेंद्र सहवागने सन 2008 मध्ये एक हजार धावा पूर्ण केल्या. यावर्षी त्याने तिहेरी शतक (319 धावा, 26 मार्च 2008, विरुद्ध दक्षिण आफ्रिका, चेन्नई) झळकावले. तसेच एक द्विशतक (नाबाद 201 धावा 31 जुलै 2008, गाले टेस्ट, विरुद्ध श्रीलंका) काढून एकूण तीन शतके ठोकली. या दरम्यान सहवाग दोन वेळा 'नर्वस नाइटी'चाही बळी ठरला.

harbhajan
ND
हरभजनसिंह : हरभजनने यावर्षी कसोटीत 300 बळींचा टप्पा गाठला. कसोटी सामन्यात 300 बळी घेणारा तो पहिलाच भारतीय ऑफ स्पिनर आहे. इंग्लडविरूध्द चेन्नई कसोटीत 310 बळी घेत जगातील सर्वांत जास्त बळी घेणारा दुसरा ऑफ स्पिनर ठरला. हरभजनने इंग्लडचा एंड्रयू स्ट्रॉस याचा बळी घेत वेस्टइंडीजचे ऑफ स्पिनर गिब्स (309) चा विक्रम मागे टाकला. पहिल्या क्रमांकावर श्रीलंकेचा गोलंदाज मुथैया मुरलीधरन आहे.

एकदिवसीय क्रिकेट:
भारतीय संघाने सन 2008 मध्ये पाच एकदिवसीय मालिकेत सहभागी घेतला. त्यात अशिया कप आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या किटप्लाय कपचाही समावेश आहे. या सामन्यांच्या फायनलमध्ये भारताला पराभव स्वीकारावा लागला. परंतु, ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या कॉमनवेल्थ सिरीजमध्ये भारतीय संघाने विजेतेपद मिळविले. त्याचबरोबर श्रीलंकेला त्यांच्याच भूमीवर 3-2 ने पराभूत करून विदेशात आणखी एक मालिका जिंकली. नुकताच इंग्लडचा भारताने 5-0 असा पराभव करून वर्षाच्या शेवटी दणदणीत विजय मिळविला. एकंदरीत एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतीय संघाचे वर्चस्व राहिले. गौतम गंभीर, वीरेंद्र सेहवाग, युवराजसिंह, झहीर खान, महेंद्रसिंह धोनी यांनी सन 2008 मध्ये चांगली कामगिरी करून आपली छाप सोडली.

गौतम गंभीर : भारतीय संघाला गंभीरच्या माध्यमातून एक चांगला फलंदाज मिळाला आहे. कसोटी, एकदिवसीय किंवा 20-20 मध्येही तो उपयुक्त खेळाडू आहे. त्याने वर्ष 2008 मध्ये एकदिवसीय सामन्यात एक हजार धावा पूर्ण केल्या. सौरव गांगुली आणि सचिन तेंडुलकरनंतर एक हजार धावा पूर्ण करणारा तो तिसराच फलंदाज आहे.

युवराजसिंह : भारतीय क्रिकेट संघात 'बिगहीटर' म्हणून युवराजसिंह याची ओळख आहे. अनेक अटीतटीच्या सामन्यात युवराजने भारताला विजय मिळवून दिला आहे. नुकत्याच झालेल्या इंग्लडविरूध्दच्या मालिकेत त्याला मालिकावीर हा पुरस्कार मिळाला.

वीरेंद्र सेहवाग : स्फोटक फलंदाजीसाठी सेहवाग प्रसिध्द आहे. अनेक सामन्यांमध्ये त्याने भारताला जोरदार सुरवात करून दिली आहे.

महेंद्रसिंह धोनी : एक यशस्वी कर्णधाराबरोबर एक यशस्वी फलंदाज म्हणूनही धोनी ओळखला जातो. 20-20, एकदिवसीय संघानंतर आता कसोटी संघाचे कर्णधारपद त्याला देण्यात आले आहे. आतापर्यत कसोटीमध्येही 100 टक्के यश धोनीला मिळाले आहे.

झहिर खान : कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये झहीर खानने भारतीय संघात महत्वाची भूमिका बजावली आहे. रिवर्स स्विंगवर हुकमत असल्याने शेवटच्या षटकामंध्ये त्याची गोलंदाजी उपयुक्त ठरते.

क्रिकेटमधील 2008 मधील महत्वाच्या घटना:

सिडनी टेस्ट वाद : भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये सिडनीत खेळल्या गेलेल्या सामन्यात एंड्रयू सायमंड्‍स आणि हरभजनसिंह यांच्यातील वादाने गंभीर स्वरूप धारण केले. या प्रकरणाच्या सुनावणीनंतर हरभजनने सायमंड्‍सवर वर्णद्वेषी आरोप केल्याचा ठपका ठेवण्यात आला. तसेच एका कसोटी सामन्याची बंदी त्यावर आणली. या वेळी भारत आणि ऑस्ट्रेलियन क्रिकेटमधील संबंध ताणले गेले होते.

आयपीएल : सन 2008 मध्ये इंडियन क्रिकेट लीगचे (आईपीएल) यशस्वी आयोजन करण्यात आले आहे. क्रिकेट इतिहासातील ही क्रांतिकारक घटना होती. यात आयपीएलमधील क्रिकेटची लोकप्रियता वाढण्याबरोबर उत्पन्नाचे नवनवीन विक्रम तयार झाले.

हरभजन-श्रीसंथ ‍थप्पड प्रकरण : आयपीएलच्या सामन्यादरम्यान मुंबई इंडियन्सचा कर्णधार हरभजनसिंहने पंजाब किंग्स इलेवनच्या एस श्रीसंथला जोरदार थप्पड लगावली होती. यामुळे आईपीएल कमेटी आणि भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने हरभजनवर पुढील सामने खेळण्यास बंदी आणली. यामुळे हरभजनचे करोडो रुपयांचे नुकसानही झाले.

बांगलादेशच्या खेळाडूंचे बंड: बांगलादेशच्या राष्ट्रीय संघातील खेळाडू आपल्या क्रिकेट मंडळाच्या विरोधात जाऊन इंडियन क्रिकेट लीग (आईसीएल) मध्ये सहभागी झाले. त्यात कर्णधार हबीब उल बशर, आलोक कपाली, आफताब अहमद, शहरयार नफीस सहित इतर खेळाडूंचा समावेश होता. यामुळे बांगलादेश क्रिकेट नियामक मंडळाने या खेळाडूंवर कारवाई करीत त्यांच्यावर 10 वर्षाची बंदी घातली.

वेबदुनिया|

पाक दौरा रद्द : मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान दौर्‍यास भारत सरकारने परवानगी नाकारली. यामुळे भारतीय क्रिकेट संघाने पाकिस्तानचा दौरा रद्द केला.


यावर अधिक वाचा :

PUBG गेम आपल्याला पोहोचवू शकतो हॉस्पिटलमध्ये

national news
व्हिडिओ गेम PUBG बद्दल आपल्याला माहिती असेलच परंतु आपल्याला कदाचित याच्या वाईट ...

प्रजास्ताक दिनाचा इतिहास

national news
भारताला ब्रिटीश राजवटीपासून १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. यामागे भारताचा ...

सर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे आदेश

national news
शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे तोंडी आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर सार्वजनिक ...

डाउनलोड स्पीडमध्ये रिलायंस जिओ अव्वल

national news
गेल्या वर्षभरात 4जी डाउनलोड स्पीडच्या बाबतीत जिओने अव्वल क्रमांक गाठलाय. 2018 मध्ये जिओ ...

मायक्रोसॉफ्ट Windows 7 चा सपोर्ट बंद करणार

national news
प्रसिद्ध कंपनी मायक्रोसॉफ्टने Windows 7 चा सपोर्ट बंद करण्याची तयारी केली आहे. विंडोज ७ ...

मधाचे 5 औषधी उपचार

national news
मध वापरण्याने आपण अनेक किरकोळ रोग टाळू शकतो. जाणून घ्या मधाचे 5 घरगुती उपचार - 1. ...

नागरी सहकारी बँकांची ऑनलाईन पद्धतीने नोकरभरती

national news
राज्यातील सर्व नागरी सहकारी बँकांनी स्टाफिंग पॅटर्न निश्‍चित करावा. सोबतच बॅकांनी ऑनलाईन ...

जाणून घ्या डाव्या कुशीवर झोपण्याचे 7 फायदे

national news
चांगल्या आरोग्यासाठी झोपणे जितके आवश्यक आहे तितकीच महत्त्वाची आहे झोपण्याची शैली. होय, ...

साखरेचे आश्चर्यकारक घरगुती उपचार

national news
स्वयंपाकघरात सहजच सापडणारी साखर केवळ जेवणात गोडपणा विरघळत नाही तर घरातील बर्‍याच ...

नवीन वर्षात अशी घ्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी

national news
उपचाराहून प्रतिबंध अधिक चांगला. या नवीन वर्षात आपण ही म्हण गांभीर्याने घ्यायला हवी आणि ...