testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

शेतकरी संप : पूर्ण राज्यात प्रथमच शेतकरी संपावर

farmer
Last Modified शुक्रवार, 22 डिसेंबर 2017 (15:56 IST)
आज पर्यंत अनेक कामगार आपण संपावर गेलेला पाहिले आहे. मात्र शेतकरी कधीही संपावर गेला नव्हता. मात्र तसे झाले या २०१७ वर्षात १ जूनपासूनच्या शेतकऱ्यांच्या संपाला सुरुवात झाली असून शेतकरी संपाची पहिली ठिणगी सातारा जिल्ह्यात पडली होती. यामध्ये दुधाचा ट्रक थांबून त्यातून दुध हे जमिनीवर टाकले होते. शेतकरी संघटनेने कोल्हापूरहून मुंबईला जाणारी दूध वाहतूक रोखून धरीत वारणा दूध डेअरीच्या दोन ट्रकची तोडफोड केली.कर्जमाफी आणि शेतमालाला हमीभाव देणे शक्य होणार नाही, असे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. झालेली चर्चा निष्फळ ठरली. त्यामुळे मुंबईला जाणारे भाजीपाला व दुधाचे टँकर रोखण्यासाठी संपकरी
तयार झाले होते. शिवसेना, मराठा क्रांती मोर्चा, शिवप्रहर संघटना, शेतकरी संघटना आक्रमक झाल्या असून त्यांनी शेतकरी संपात सहभाग नोंदवला होता.नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, औरंगाबाद येथून जाणारा भाजीपाला व दूध यांची वाहने मुंबई-नाशिक महामार्गावर घोटी, इगतपुरी येथे अडवायची, नगर, बीड, पुणे जिल्ह्यातील वाहने माळशेज घाटात, तर कोल्हापूर, सांगली, सोलापूर, सातारा येथून येणारी वाहने पुणे आणि लोणावळा शहराच्या अलीकडे अडवायची असे नियोजन करत संप सुरु केला होता.
शेतकरी संपामुळे ठप्प असललेल्या राज्य भरातल्या बाजार समित्या जवळपास ८ दिवसानी पूर्व पदावर येत होत्या.नवी मुंबईत महाराष्ट्रातूनच ५० टक्के गाड्या आल्यायत.
संगमनेर, कात्रज, सांगलीमधून भाजीपाला आणि फळं एपीएमसीमध्ये दाखल झालीयत. भाजीपाल्याची आवक वाढल्यानं भाज्यांचे भावही उतरायला लागले होते. संपाच्या काळात तुटवड्यामुळे भाज्यांचे वाढ कमालीचे वाढले होते.शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्या, शेतमालाला हमीभाव द्या, दुधाला प्रती लिटर ५० रुपये भाव द्या व इतर मागण्या शेतकरी संघटनांनी लावून धरल्या होत्या. शेतकरी कर्ज माफी करत हा शेतकरी संप मागे घेण्यात आला आहे.


यावर अधिक वाचा :

जीएसटी जगातील सर्वात गुंतागुंतीची कर प्रणाली

national news
सरकारने लागू केलेल्या वस्तू आणि सेवा कर विधेयकावर (जीएसटी) जागतिक बँकेने गुंतागुंतीचा ...

भयंकर : मॉलमध्ये तृतीयपंथीयाला प्रवेश नाकारला

national news
पुण्यातील एका मॉलमध्ये तृतीयपंथीयाला प्रवेश नाकारण्यात आला. शहरातील विमाननगर परिसरात ...

जीओची पुन्हा एकदा एक नवी धमाकेदार ऑफर

national news
रिलायन्स जिओने पुन्हा एकदा एक नवी धमाकेदार ऑफर सादर केली आहे. या ऑफरमध्ये युजर्संना ८ ...

राज ठाकरे यांनी घेतली शरद पवारांची भेट

national news
राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. सकाळीच ते ...

राहुल गांधी यांनी केला ट्विटर हँडल बदल

national news
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचं ट्विटर हँडल बदललं आहे. आधी ‘Office of RG’ असे ट्विटर ...

असे डाउनलोड करा ई-आधार

national news
भारतीय नागरिकांसाठी आधार कार्ड अनिवार्य झाले असून अनेक सेवा आणि योजनांसाठी सरकारने आधार ...

एसबीआय क्विक अॅप सुरु

national news
स्टेट बँक ऑफ इंडियाने एसबीआय क्विक अॅप सुरु केले आहे. या अॅपमध्ये खास एटीएम कार्डच्या ...

४ जी स्पीड मध्ये भारत फार मागे तर हा देश सर्वात पुढे

national news
आपल्या देशाचा जर विचार केला तर नवी मुंबईचा 4G इंटरनेट स्पीड देशाच्या अन्य शहरांच्या ...

सोन्याचे बॅक कव्हर असलेला iPhone X लाँच

national news
नुकताच कॅविअॅर या रशियन कंपनीनं सोन्याचं बॅक कव्हर असलेला iPhone X बाजारात लाँच केला आहे. ...

स्मार्टफोनच्या व्यसनाचे कारण

national news
स्मार्टफोन आज आपल्यसाठी कोणत्याही वस्तूपेक्षा जास्त गरजेचा बनला आहे. काहींना क्षणभरही ...