गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मागोवा 2018
Written By
Last Updated : बुधवार, 19 डिसेंबर 2018 (13:39 IST)

भारताला नवीन क्रिकेट स्टार मिळाला आगमनात पृथ्वी शॉच शतक

भारतीय क्रिकेट मध्ये पुन्हा एकदा एक नवीन स्टार मिळाला आहे. विशेष म्हणजे भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात सुरु झालेल्या सामन्यात युवा खेळाडू पृथ्वी शॉनं त्याच्या पहिल्याच कसोटी सामन्यात जोरदार शतक ठोकलं आहे. पदार्पणातच दणदणीत शतक ठोकत त्याने त्याचं महत्त्व दाखवून दिलं आहे. राजकोट येथे भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात 2 सामन्यांची टेस्ट सिरीज सुरु आहे. भारताचा सामना या नंतर ऑस्ट्रेलिया सोबत होणार आहे.
 
पृथ्वीने आगमनातील पहिले शतक 98 बॉलमध्ये केले आहे. पृथ्वीच्या नेतृत्वातच भारताने अंडर-१९ चा विश्वकप ही सुद्धा जिंकला आहे.  राजकोटच्या याच मैदानावर त्याने रणजी सामन्यात पदार्पण करत शतक ठोकल असून, टेस्टमध्ये शतक ठोकणारा तो भारताचा सर्वात युवा खेळाडू ठरला आहे. या आगोदर शिखर धवन - 85 बॉलमध्ये शतक - ऑस्ट्रेलिया, मोहाली, 2013, ड्वेन स्मिथ - 93 बॉलमध्ये शतक - दक्षिण आफ्रिका, केपटाउन, 2004, पृथ्वी शॉ - 99 बॉलमध्ये शतक - वेस्टइंडिज, राजकोट, 2018 असे आगमनात शतक करणारे खेळाडू आहेत.