मंगळवार, 5 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. रशिया - युक्रेन संघर्ष
Written By
Last Updated : बुधवार, 2 मार्च 2022 (17:40 IST)

युक्रेनमध्ये दुसऱ्या भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू,पंजाबच्या चंदनचा मृत्यू

रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यात आणखी एका भारतीयाचा मृत्यू झाल्याची बातमी आहे. पंजाबमधील चंदन जिंदाल नावाच्या 22 वर्षीय विद्यार्थ्याचा बुधवारी मृत्यू झाला. मात्र, चंदनचा मृत्यू हल्ल्याने झाला नसून आजाराने झाला. त्याला युक्रेनमधील विनित्सा मेडिकल युनिव्हर्सिटीच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. ब्रेन स्ट्रोकमुळे त्याला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान बुधवारी चंदनचा मृत्यू झाला. युक्रेनमध्ये भारतीयांचा हा सलग दुसरा मृत्यू आहे. याआधी मंगळवारी खारकीव्हमध्ये झालेल्या गोळीबारात कर्नाटकचा रहिवासी असलेल्या नवीनचा काही वस्तू घेण्यासाठी सुपरमार्केटमध्ये गेला असता झालेल्या गोळीबारात मृत्यू झाला होता. 
 
चंदन जिंदाल हा विनितसिया नॅशनल पायरोगोव्ह, मेमोरियल मेडिकल कॉलेजमध्ये शिकत होता. चंदनच्या वडिलांनी केंद्र सरकारला पत्र लिहून मुलाचा मृतदेह भारतात आणण्याची मागणी केली आहे. कर्नाटकच्या नवीनचा मृतदेह लवकरात लवकर भारतात आणण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. वास्तविक युक्रेनने आपली हवाई हद्द बंद केली आहे. अशा परिस्थितीत कोणत्याही देशाचे विमान तेथे उतरू शकत नाही.
 
युक्रेनला उड्डाण बंदीमुळे भारत सरकार आता शेजारील देशांतील विद्यार्थी आणि इतर भारतीयांना आणण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचप्रमाणे शेजारील देश रोमानिया, हंगेरी, पोलंड किंवा स्लोव्हाकियामधूनही मृतदेह आणले जाऊ शकतात. त्यामुळेच या संपूर्ण प्रक्रियेला वेळ लागू शकतो. 
 
आत्तापर्यंत 10,000 हून अधिक भारतीय युक्रेनमधून मायदेशी आले आहेत. मात्र, अजूनही युक्रेनमध्येच अडकलेल्यांची संख्या मोठी आहे. खारकीव्ह, कीवसह युक्रेनमधील अनेक शहरांमध्ये विद्यार्थी अडकले आहेत. यापैकी मोठ्या संख्येने विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणासाठी युक्रेनला गेले आहेत.