काही महिलांना गर्भावस्थेत शारीरीक व मानसिक थकवा अधिक येत असल्याने त्यांना सेक्सचा आनंद घेता येत नाही. गर्भावस्थेत नेहमी उदास असलेल्या महिलामध्ये उर्जा व उत्साह निर्माण होत नसल्यास सेक्सच्या आनंदापासून त्यांना वंचित रहावे लागत असते. काही महिलाना गर्भावस्थेत रक्तस्त्राव किंवा योनी पीडा होत असल्याने आपल्या पतीला सेक्स करण्यास मज्जाव करत असतात.
पहिल्यांदा गर्भधारणा झालेल्या महिलांची पहिल्या आठवड्यात सेक्स करण्याची मुळीच इच्छा होत नाही. परंतु दोन ते तीन महिने उलटल्यानंतर या महिला सेक्सचा परिपूर्ण आनंद घेण्याची इच्छा व्यक्त करतात. प्रत्येक दिवशी सेक्स व्हावा, असे त्यांना सारखे वाटत असते.
पुरुषानी आपल्या गर्भवती पत्नीच्या सहवासात अधिक काळ राहून तिची इच्छा पूर्ण केली पाहिजे. परंतु, काही महिला या होणार्या बाळाविषयी अधिक उत्सुक असतात. त्यामुळे पतीची लहर ओळखण्याकडे त्या फारसे लक्ष देत नाहीत. या काळात पुरूषांनी पत्नीला समजून घेणे महत्त्वाचे आहे.
गर्भावस्थेत सेक्स करताना सुविधापूर्ण व आरामदायी आसनांचा काळजीपूर्वक अवलंब केला पाहिजे. मात्र, गर्भावस्थेत शक्यतो सेक्स न करणेच योग्य. या अवस्थेत स्त्रियाना अधिक आराम करू दिला पाहिजे. या संदर्भात दाम्पत्याने डॉक्टराचा सल्ला घेणेच योग्य ठरेल.