testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

रात्री उशिरा झोपणार्‍या पुरुषांना नपुंसक होण्याचा धोका

स्मार्टफोन आल्यापासून रात्री उशीरापर्यंत हातात फोन ठेवणार्‍यांची संख्या वाढत असून अनेक लोकं टीव्ही किंवा वेब सीरीज बघण्यात वेळ घालवत असतात. हे अगदी सामान्य असलं तरी याने झोपेवर परिणाम होत असल्याचं अनेक शोधात कळून आलेले आहे.

या नादात अनेक लोकं तर मध्य रात्रीपर्यंत जागे असतात. परंतू याने नात्यांवर तर परिणाम पडतच आहे पण आता आरोग्यावर देखील दुष्परिणाम दिसून येत आहेत. आपण यावर कधी विचार केला नसेल तर जाणून घ्या की रात्री 2 किंवा 3 वाजेपर्यंत न झोपणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक ठरू शकतं. याने डोळ्याखाली काळे वर्तुळ, अपचन, कब्ज अशा समस्या दिसून येतात.

आरोग्य तज्ज्ञांप्रमाणे एक स्वस्थ जीवन शैली एक स्वस्थ जीवनाचं नेतृत्व करते आणि या प्रक्रियेत एक स्वस्थ कुटुंब नियोजन देखील सामील आहे. म्हणून कुटुंब वाढवण्याची योजना आखत असणाऱ्या पुरुषांसाठी लवकर झोपणे आणि लवकर उठणे, गोल्डन रूल सिद्ध होऊ शकतो. कारण रात्री उशीरापर्यंत जागत राहण्याने नपुंसकत्वाचा धोका वाढतो, अलीकडेच झालेल्या एका शोधात स्पष्ट झाले आहे.
या अध्ययनानुसार लवकर झोपणारे पुरुष म्हणजे सुमारे 10.30 वाजेपर्यंत झोपणार्‍या पुरुषांमध्ये उत्तम गुणवत्ता असलेले शुक्राणू होण्याची शक्यता अधिक असते. इतर पुरुषांच्या तुलनेत जे 11.30 वाजता झोपतात, त्यांच्या शुक्राणू म्हणजे स्पर्मची गुणवत्ता बिघडते.

तसेच मागील अनेक शोध झाले आहेत ज्या झोप पुरुष आणि महिलांच्या प्रजनन क्षमतेवर प्रभाव टाकते हे स्पष्ट झालेले आहे. परंतू याचा पुरावा नाही. परंतू मेंदूचा काही भाग स्लीप हार्मोन आणि शुक्राणू प्रक्रियेचं उत्पादन दोन्हीला प्रभावित करतं.
अध्ययनाप्रमाणे अनिद्रा शुक्राणू पतनाचे मूळ कारण आहे. या व्यतिरिक्त अनेक कारणं देखील सामील आहेत ज्यात मनोवैज्ञानिक कारणं देखील आहेत. झोप न झाल्यामुळे पुरुषांना अधिक ताण जाणवतो ज्यामुळे त्यांच्या पौरुष क्षमतेवर वाईट परिणाम पडतो.

म्हणून पुरुष असो वा महिला दोघांनी किमान 7 ते 8 तास झोप काढावी. या व्यतिरिक्त झोपेच्या वेळेत खूप बदल नसावा. झोपेची वेळ निश्चित असल्यास उत्तम. कारण चांगली आणि पूर्ण झोपेमुळे शुक्राणूंची गुणवत्ता वाढते आणि त्यामुळे प्रजनन क्षमतेत देखील सुधार होतो.


यावर अधिक वाचा :

सेक्स लाईफ सुधारण्यासाठी आहाराचा कितपत उपयोग होतो?

national news
जर एखाद्या अन्नपदार्थामुळे सेक्स लाईफ सुधारते, असं सिद्ध झालं तर ते पदार्थ हमखास विकले ...

किस करण्याचे फायदे जाणून घेतल्यावर दररोज घ्याल चुंबन

national news
ओंठावर किस करणे प्रेम दर्शवण्याचा भाव आहे. पण आपल्याला हे माहित आहे का की ओठांवर किस ...

रात्री उशिरा झोपणार्‍या पुरुषांना नपुंसक होण्याचा धोका

national news
स्मार्टफोन आल्यापासून रात्री उशीरापर्यंत हातात फोन ठेवणार्‍यांची संख्या वाढत असून अनेक ...

हे प्रश्न विचारा आणि त्याला स्पर्श न करता उत्तेजित करा

national news
शारीरिक संबंधात स्पर्शाचं आपलं महत्त्व आहे. हात, खांदे, गळा, ओठ यांना स्पर्श करून ...

तुम्ही डेमिसेक्‍शुअल (demisexual) तर नाही, जाणून घ्या याचे ...

national news
मागील काही वर्षांमध्ये सेक्‍शुएलिटीबद्दल लोक जास्त खुलून बोलू लागले आहे. आता या ...