शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. शरद पौर्णिमा
Written By
Last Modified: गुरूवार, 26 ऑक्टोबर 2023 (22:46 IST)

sharad purnima 2023: शरद पौर्णिमेला चंद्रग्रहणाची छाया, कोणत्या वेळी पूजा करावी?

Sharad Purnima 2023
sharad purnima 2023: वर्षातील शेवटचे खंडग्रास चंद्रग्रहण शरद पौर्णिमेच्या दिवशी होईल. 28 ऑक्टोबर 2023 रोजी शरद पौर्णिमा हा सण ग्रहणाच्या छायेत साजरा केला जाईल. अशा स्थितीत जाणून घ्या शरद पौर्णिमेची पूजा कधी करावी आणि खीर कधी चंद्रप्रकाशात ठेवावी.
 
चंद्रोदय आणि चंद्रास्ताची वेळ-
28 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 04:17 वाजता उगवेल आणि 05:42 वाजता मावळेल.
28 ऑक्टोबर 2023 रोजी संध्याकाळी 05:19 वाजता चंद्र पुन्हा उगवेल, जो दुसऱ्या दिवशी मावळेल.
 
पौर्णिमा तिथीची सुरुवात आणि  अंत-
पौर्णिमा तिथीची सुरुवात - 28 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 04:17 पासून.
पौर्णिमा तिथी संपेल – 29 ऑक्टोबर 2023 सकाळी 01:53 वाजता.
 
चंद्रग्रहण किती काळ टिकेल?
या ग्रहणाचा प्रारंभिक टप्पा 28 ऑक्टोबर रोजी रात्री 11.31 पासून सुरू होईल.
यानंतर, त्याची पहिली स्पर्श वेळ मध्यरात्री 01:06 वाजता असेल.
यानंतर, मध्यरात्री 01:44 वाजता ते शिखरावर असेल.
यानंतर, त्याची शेवटची स्पर्श वेळ मध्यरात्री 02:22 असेल.
शेवटी हे ग्रहण पहाटे 3.55 च्या सुमारास संपेल.
तथापि, खंडग्रासची वेळ मध्यरात्री 01:06 ते 02:22 पर्यंत राहील.
 
चंद्रग्रहणाचा सुतक कालावधी कधी सुरू होईल?
सुतक कालावधी 28 ऑक्टोबर रोजी दुपारी 02:52 वाजता सुरू होईल.
सुतक कालावधी 29 ऑक्टोबर रोजी पहाटे 02:22 वाजता समाप्त होईल.
 
विशेष : ग्रहणकाळ आणि सुतक काळात पूजा केली जात नसल्यामुळे सुतक काळापूर्वी पूजा करावी लागेल. सुतक काळापूर्वी नमूद केलेला काळ पौर्णिमा तिथीचा आहे.
 
28 ऑक्टोबर 2023 रोजी शरद पौर्णिमेला पूजेसाठी शुभ मुहूर्त:-
अभिजीत मुहूर्त- सकाळी 11:42 ते दुपारी 12:27 पर्यंत.
विजयी मुहूर्त: दुपारी 01:56 ते 02:41 पर्यंत.
शुभ योग : या दिवशी शुभयोग, सिद्धी, बुधादित्य, गजकेसरी आणि षष्ठ योग असतील.