शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. श्राद्धपक्ष
Written By

श्राद्धात या प्रकारे करावा ब्राह्मण भोज, पितृ प्रसन्न होतील

श्राद्ध तिथीला भोजनासाठी ब्राह्मणांना आधीपासून आमंत्रित करावे.
ब्राह्मणांना दक्षिण दिशेत बसवावे कारण दक्षिर दिशेत पितरांचा वास असतो.
हातात पाणी, अक्षता, फूल आणि तीळ घेऊन संकल्प करावा.
कुत्रा, गाय, कावळा, मुंग्या आणि देवतांना नैवेद्य दिल्यावर ब्राह्मणांना भोजन करवावे.
भोजन दोन्ही हाताने वाढावे, एका हाताने धरलेले किंवा वाढलेले खाद्य पदार्थ राक्षस हिसकावून घेतात.
ब्राह्मण भोज झाल्याशिवाय, पितृ भोजन करत नाही.
ब्राह्माणांना तिलक लावून कपडे, धान्य आणि दक्षिणा देऊन त्यांचा आशीर्वाद घ्यावा.
भोजन झाल्यावर ब्राह्मणांना दारापर्यंत सोडायला जावे.
ब्राह्मणांसोबत पितर विदा होतात.
ब्राह्मण भोजन झाल्यावर स्वत: कुटुंबासह भोजन करावे.
श्राद्ध करताना भिक्षा मागणार्‍यांना सन्मानपूर्वक भोजन करवावे.
बहिण, जावई आणि भांच्याला भोजन करवावे. यांनी भोजन केल्याशिवाय पितर भोजन करत नाही.
कुत्र्या आणि कावळ्याचे भोजन त्यांच्या व्यतिरिक्त इतर जनावरांना खाऊ घालू नये.
देवता आणि मुंग्याचा आहार गायीला खाऊ घालता येईल.