मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. श्रावण
Written By
Last Modified: सोमवार, 17 ऑगस्ट 2020 (22:19 IST)

ओझे वर्षभर मरमरत वाहणे...

ओझे वर्षभर मरमरत वाहणे, 
एक दिवसा साठी, देवपण तव येणे,
झुल पांघरून, व्रण ते झाकावे,
बारा महीने, ऊन-पाऊस झेलावे,
तू आहेस म्हणून, असे आमुची तमा,
नाही तर कोण राबील, उत्तर नाही ठावे आम्हा,
करुनी कष्ट खूप, तुही थकतो रे,
सांग "वृषभा"तुझे पांग कसे फेडू रे!
सखा आहे तू श्रेष्ठ, मानवजातीचा,
एक दिवस नक्कीच आहे तुझ्याच पूजेचा,
महत्व तुझे आहे अनन्यसाधारण,
शेतीत राबती, तुझेच पुण्यचरण,
होवो तुही तृप्त आज गोड धोड खाऊन,
व्हावेत कष्ट कमी तुझे, ही प्रार्थना करून !
....अश्विनी थत्ते.