बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. श्रावण
Written By
Last Updated : मंगळवार, 21 जुलै 2020 (12:48 IST)

नाग पंचमी 2020 : कालसर्प दोषांची 13 लक्षणे, आणि 11 उपाय..

ज्या लोकांच्या जन्म पत्रिकेत कालसर्प दोष असतो किंवा ज्यांचा हातून कळत-नकळत सापाला ठार मारले गेले आहेत, त्यांचा आयुष्यात बरेच चढ-उतार येतात.
जर जन्मपत्रिका नसेल आणि आयुष्यात पुढील समस्यांपैकी एखादा तरी त्रास जाणवला तर त्याने स्वतःला कालसर्प दोषाने व्याधलेले समजावं आणि नागपंचमीच्या दिवशी हे उपाय करावे.
1 कठोर परिश्रम करून देखील फळ मिळत नसेल.
2 व्यवसायात वारंवार नुकसान होणं.
3 आपल्या माणसांकडूनच फसवणूक होणं.
4 विनाकारण कलंकित होणं.
5 अपत्य न होणं किंवा अपत्याची प्रगती न होणं.
6 लग्न न होणं. किंवा वैवाहिक जीवनात व्यवधान येणे.
7 आरोग्य खराब राहणं.   
8 वारंवार इजा किंवा अपघात होणं.
9 चांगल्या केलेल्या कार्याचे यश दुसऱ्यांना मिळणं.
10 वारंवार भीतिदायक स्वप्नं येणं, नाग-नागिणीला स्वप्नात बघणं.
11 काळी स्त्री जी विधवा आहे आणि भीतीपोटी रडत आहे, दिसणं.
12 मृत झालेली व्यक्ती स्वप्नात काही मागितल्यावर, वराड दिसणं, पाण्यात बुडणे, जावळ दिसणं, अपंग दिसणं.
13 गर्भपात होणं किंवा संतानं होऊन देखील न जगणं इत्यादी हे कोणते ही लक्षण आढळल्यास तर कालसर्पदोषाची शांती करवावी.
 
नागपंचमीच्या दिवशी केले जाणारे काही उपाय पुढील प्रमाणे आहेत जे केल्याने कालसर्प दोष कमी होतं.
1 चांदीचा नाग-नागिणीचं जोडपं बनवून पूजा करून पाण्यात सोडावं.
2 नारळावर असेच जोडपं बनवून माउली(मौली)ने गुंडाळून पाण्यात सोडावं.
3 गारुडी कडून सापाचं जोडपं पैसे देऊन अरण्यात सोडावं.
4  शंकराच्या एखाद्या अश्या देऊळात जेथे, शंकरावर नाग नसेल, त्या देऊळात नाग प्रतिष्ठा करून नाग अर्पण करावं.
5 चंदनाच्या लाकडाने बनलेले 7 माउली(मौली) दर बुधवारी किंवा शनिवारी शंकराच्या देऊळात अर्पण करावं.
6 शंकराला चंदन किंवा चंदनाचा अत्तर लावावे आणि स्वतःला देखील नेहमी लावा.
7 नागपंचमीच्या दिवशी देऊळाची स्वच्छता, डागडुजीकरणे, आणि दुरुस्ती करवावे.
8 पुढील मंत्रांनी जप होमहवन करावं. किंवा करवून घ्यावें.
(अ) 'नागेन्द्र हाराय ॐ नम: शिवाय'
(ब) 'ॐ नागदेवतायै नम:' या नागपंचमी मंत्र 'ॐ नागकुलाय विद्महे विषदन्ताय धीमहि तन्नौ सर्प प्रचोद्यात्।'
9 शंकराला विजया अर्क फुल, धोत्राचे फुल ,फळ अर्पण करावं आणि दुधाने रुद्राभिषेक करावं.
10 आपल्या वजनाच्या बरोबरीचा कोळशा पाण्यात वाहून द्या.
11 नेहमी गोमूत्राने दात स्वच्छ करा.