श्रावणी शुक्रवार/ जिवती पूजा
दर शुक्रवारी जिवत्यांना कापसाचे गेजवस्त्र, दुर्वा-आघाडा यांची माळ वाहतात.
पूजा करुन पुरणाचा नैवेद्य व आरती करतात.
घरातील लहान मुलांना औक्षण करतात.
सुवासिनी व लेकुरवाळी स्त्री सवाष्ण म्हणून बोलावतात. तिची खणा-नारळाने ओटी भरुन लक्ष्मी समान पूजा करतात.
संध्याकाळी सुवासिनींना हळदीकुंकवास बोलावून दूध-साखर व फुटाणे देतात. त्याचप्रमाणे काही ठिकाणी ओला हरभरा याची खिरापत देण्याची पद्धत आहे.
ही पूजा मुलांच्या सुखरुपतेसाठी व दिर्घायुष्यासाठी करतात.