testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

जिवत्या : नागनरसोबा

वेबदुनिया|
श्रावण महिन्यांत सुवासिनी स्त्रिया जिवतीची पूजा दर शुक्रवारी करतात. छार्पाल नागनरसोबाची चित्रे मिळतात. त्यांची पूजा करतात. नागपंचमीच्या दिवशी नागचित्राची पूजा व चार शनिवारी नरसोबाची पूजा, चारी बुधवारी बुधाची पूजा व गुरुवारी बृहस्पतीची पूजा करतात.
प्रत्येक पूजेच्या वेळी कापसाची गजमाळ व आघाडा, दूर्वा यांची माळ वाहतात. दर शुक्रवारी जिवत्यांची पूजा, पुरणाचा नैवेद्य व आरती करतात. सुवासिनी व लेकुरवाळी स्त्री सवाष्ण म्हणून बोलावतात. संध्याकाळी सुवासिनींना हळदी कुंकवास आमंत्रण देऊन दूध-साखर व फुटाणे देतात. मुलाबाळांच्या सुखरूपतेसाठी जिवतीची पूजा करण्याची पद्धत आहे.


यावर अधिक वाचा :