शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. »
  3. सण-उत्सव
  4. »
  5. श्रावण
Written By वेबदुनिया|

घृश्णेश्वर

WD
औरंगाबादहून 11 किलोमीटरवर असलेले हे जोतिर्लिंग पूरातन आहे. जवळच दौलताबानचा किल्ला व अजंठा-वेरूळ असल्यामुळे येथे मोठ्या प्रमाणावर पर्यटक येतात. इंदूरच्या राणी अहिल्याबाई होळकर यांनी येथे देऊळ बांधले.

याची बांधणी वैशिष्ट्यपूर्ण आहे. या जोतिर्लिंगाबाबत पौराणिक कथा आहे. कुसूमा नावाची एक स्त्री ‍शंकराची मनोभावे पुजा करत असे. ‍ती शिवलींग एका टाकीत पाण्यात बुडवून काढत असत.

तीच्या नवरयाच्या पहिल्या बायकोला ते पाहवत नाही. ती कुसूमच्या मुलाला ठार करते. दु:खी झालेली कुसूम तरीपण शिवलीगांची पुजा करत असते.

जेव्हा ती शिवलींग पाण्यात बुडवते व वर काढते तेव्हा तिचा मुलगा आर्श्चयकारकपणे जिवंत होतो. त्यामुळे येथे शिवलींगाला घ्रिश्णेश्वर म्हणतात.