शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. श्रावण
Written By wd|
Last Modified: सोलापूर , शनिवार, 9 ऑगस्ट 2014 (12:34 IST)

सोमवारी सिध्दरामेश्वर पालखी सोहळा

श्री शिवयोगी सिध्दरामेश्वर हब्बू पुजारी परिवार चॅरिटेबल ट्रस्ट आणि बृहन्मठ होटगी संस्थेच्यावतीने श्रवणमानिमित्त यंदाही सोमवार 11 ऑगस्ट रोजी सिध्दरामेश्वर पालखी सोहळा महोत्सव होणार आहे. त्यामध्ये अनेक गावांच्या पालख्या मिरवणुकीने श्री सिध्देश्वर मंदिरात येणार आहेत.
 
10 ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता सर्व पालख्या अक्कलकोट रस्तवरील श्री वीरतपस्वी मंदिरात येणार असून त्या ठिकाणी रात्री कीर्तन, प्रवचन, भजनाचा कार्यक्रम होणार आहे. उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप होईल. तपोत्नं योगिराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजींच्या प्रेरणेने गेल्या दहा वर्षापासून हा महोत्सव साजरा होत आहे. 
 
सोमवारी सकाळी सहा वाजता श्री सिध्देश्वर देवस्थान पंच कमिटीचे अध्क्षय धर्मराज काडादी यांच्या हस्ते व माजी आमदार रविकांत पाटील यांच्या उपस्थितीत महाआरती व पालखी पूजा होईल. त्यानंतर पालख्या पारंपरिक मार्गाने श्री सिध्देश्वर मंदिराकडे मार्गस्थ होणार आहे. दुपारी एक वाजता पालख्या मंदिरात पोहोचल्यानंतर विजकुमार देशमुख, प्रणिती शिंदे, सुनील गुरुजी, माजी आमदार शिवशरण पाटील आणि कुमार करजगी यांच्या उपस्थितीत सिध्दरामेश्वरांच्या योगसमाधीस महाआरती होईल. त्यानंतर भाविकांना महाप्रसादाचे वाटप होईल. तेथून पालख्या आपापल्या पूर्व ठिकाणी परतणार आहेत.