testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

सिंहासन बत्तिशीची कथा क्र. 10 (प्रभावती)

सिंहासन बत्तीसी
PR
PR
एकदा शिकार करण्यासाठी जंगला गेला होता. मात्र तो आपल्या सहकार्‍यापासून खूप पुढे निघून गेला. राजा जंगलात हिंडत असताना एक तरुण झाडाला दोरखंडाच्या सहाय्याने फाशी घेत असल्याचे राजाला दिसले. राजा त्याच्याकडे गेला व त्याला तसेपासून परावृत्त केले. आत्महत्या करणे पाप असून तो एक सामाजिक गुन्हा आहे, असं सांगितले. राजा असल्याच्या नात्याने तो त्याला शिक्षाही देऊ शकतो, असे ही फटकारले. तरुण घाबरला व रडू लागला.

राजाने त्याला आत्महत्या करण्यामागील कारण विचारले. तेव्हा त्याने सांगितले क‍ि, तो कालिंग येथील रहिवासी आहे. त्याचे नाव वसु आहे. एके दिवशी तो जंगलातून जात असताना त्याला एक सुंदर तरुणी दिसली. तिच्या रूपावर तो मोहित झाला आहे.

त्याने त्या तरूणीसमोर विवाहाचा प्रस्ताव ठेवला होता. त्याला तिने नकार दिल्याने तो आत्महत्या करत असतल्याचे राजा त्याने सांगितले.

नकार देण्याचे काय कारण? असे त्याला राजाने विचारल्यानंतर त्याने सांगितले, ती एक अभागी राजकुमारी आहे. तिचा जन्म अशा नक्षत्रात झाला आहे की तिचे मुख पाहिल्यानंतर तिचे वडिल मरण पावतील. तिच्या जन्मापासूनच तिला एका संन्यास्याजवळ ठेवण्यात आले आहे. तोच तिचे पालनपोषण करीत आहे. जो तरुण उकळत्या तेलाच्या कढाईतून बाहेर येऊन दाखवेल. त्याच्याशीच तिचा विवाह होईल, असे वसूने राजाला सांगितले.

राजा विक्रमने वसूची मदत करण्याचे ठरविले. त्याचा त्या राजकुमारीशी विवाह करून देण्यासाठी वाटेल ते करीन असे त्याला वचन दिले. राजाने दोन्ही वेताळांचे स्मरण करताच ते राजाच्या सेवत क्षणात उपस्थित झाले. राजा आणि वसूला घेऊन ते राजकुमारी रहात असलेल्या झोपडीजवळ आले.

तपस्वीला भेटून राजा विक्रमादित्यने वसुसाठी राजकुमारीला मागणी घातली मात्र त्यांनी सांगितले की, अट मान्य असेल तरच? राजा त्या तरूणासाठी उकडत्या तेलाच्या कढाईत उडी मारण्यास तयार आहे, असे सांगताच संन्यासी आश्चर्यचकीत झाला. तितक्यात राजकुमारी तिच्या मैत्रिणीसह तेथे उपस्थित झाली. ती वसूने सांगितल्याप्रमाणे लावण्यवती होती.

राजा विक्रमने तपस्वीला सांगून कढाईभर तेलाची व्यवस्था करण्यास सांगितले. जेव्हा तेल चांगले उकडू लागले, तेव्हा माँ कालीचे स्मरण करून राजाने त्या कढाईत उडी घेतली. राजाचा मृत्यु झाला. कढाईत केवळ त्याच्या हाडांचा सापाळा दिसत होता. माँ काली राजावर प्रसन्न झाली‍. तिने दोन वेताळांना राजा विक्रमास जिंवत करण्याची आज्ञा दिली. वेताळांनी राजाच्या हाडांच्या सापड्यावर अमृताचे थेंब टाकताच राजा जिंवत झाला. ही बातमी वार्‍यासारखी राजकुमारीच्या वडिलांपर्यंत पोहचली. त्यांनी राजकुमारीचा विवाह वसूबरोबर मोठ्या थाटात लावून दिला.


यावर अधिक वाचा :

हे सरकार ‘निकम्मं’ आहे: उद्धव ठाकरे

national news
“शिवसैनिकाचा हात अजून उठलेला नाही कारण शिवसेना प्रमुखांची शिकवण आहे की स्वत:हून कोणावर ...

‘हार्ले डेव्हिडसन’ मिळवण्याची अनोखी संधी

national news
‘हार्ले डेव्हिडसन’ या कंपनीने सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी एक अनोखी शक्कल लढवली आहे. या ...

आसाराम बापूला जन्मठेप

national news
जोधपूर- जोधपूर कोर्टाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी आसाराम बापूसह तीन ...

बलात्कार प्रकरणात आसाराम दोषी

national news
जोधपूर- जोधपूर कोर्टाने बुधवारी अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार प्रकरणी आसाराम बापूसह ...

कायमस्वरुपी टॅटूही पूर्णपणे काढता येणार

national news
आता टॅटू काढण्याचं नवं तंत्रज्ञान नुकतंच लॉन्च करण्यात आलंय. मेडिकल डिव्हाईस बनवणारी ...