मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. क्रिकेट मराठी
  4. »
  5. क्रिकेट लेख
Written By मनोज पोलादे|

टिम इं‍डीयाच्या टेस्ट साम्राज्याची 'टेस्ट'

टिम इंडीया इंग्लंड दौर्‍यानंतर 'टेस्ट मध्ये बेस्ट' राहिल काय, या प्रश्नाने भारतीय चाहत्यांना सद्या ताप आणला आहे. लॉर्ड्सवरील मानहानिकारक पराभवानंतर या प्रश्नाचे गांभीर्य आणखीनच वाढले आहे. मात्र, हे स्पष्ट होण्यास आणखी तीन सामने बाकी आहेत आणि पहिल्या पराभवानंतर मालिकेत दमदारपणे परतण्याचा भारतीय संघाचा इतिहास आहे. इंग्लंड टेस्टमध्ये खरोखरच दमदार आणि संतुलित संघ आहे, त्यांनी या प्रकारात ऑस्ट्रेलियास त्यांच्यात भूमित पाणी पाजून हे सिद्ध केलेच आहे. तर दुसरीकडे भारतीय संघ टेस्टमध्ये बेस्ट उगाच ठरला नाही तर त्यांनी दोन वर्षाच्या सातत्यपूर्ण कामगिरीनंतर ही बादशाहत अक्षरश: खेचून आणली आहे. मात्र सद्याचा दुखापतग्रस्त भारतीय संघ बघता कोणतेही विधान करणे धाडसाचेच ठरेल.
भारतीय संघ टेस्टमध्ये बेस्ट उगाच ठरला नाही तर त्यांनी दोन वर्षाच्या सातत्यपूर्ण कामगिरीनंतर ही बादशाहत अक्षरश: खेचून आणली आहे.


धडाकेबाज फलंदाज विरेंद्र सेहवागची अनुपस्थिती, घातक गोलंदाज झहीर खानची दुखापत आणि प्रमुख फिरकी गोलंदाज हरभजनची निष्प्रभ कामगिरी बघता टिम इंडीयाच्या टेस्टमधील साम्राज्यास इंग्रजांचा धोका सतावत आहे. लॉर्ड्स कसोटीत कमकुवत भारतीय गोलंदाजी प्रामुख्याने सामोरे आली. भारताचा निष्प्रभ मारा २० गडी बाद करू शकत नाही, हे सिद्ध झाले आहे. आणि जोपर्यंत हे शक्य नाही तोपर्यंत कसोटी जिंकणे म्हणजे दिवास्वप्न पाहण्यासारखेच आहे. तसे बघायचे झाल्यास भारताने फलंदाजीच्या भरवशावरच विश्व क्रिकेटमध्ये आपला धाक जमवला आहे. भारतीय फलंदाजीची भींत कापून घुसखो
लॉर्ड्स कसोटीत कमकुवत भारतीय गोलंदाजी प्रामुख्याने सामोरे आली. भारताचा निष्प्रभ मारा २० गडी बाद करू शकत नाही, हे सिद्ध झाले आहे. आणि जोपर्यंत हे शक्य नाही तोपर्यंत कसोटी जिंकणे म्हणजे दिवास्वप्न पाहण्यासारखेच आहे.
री करणे भल्याभल्या शत्रूंना शक्य नाही. मात्र सद्या विरेंद्र सेहवागच्या अनुपस्थितीत भारतीय फलंदाजी पंगू झाल्यासारखी वाटत आहे. सेहवाग आणि गंभीरची सलामी भारतासाठी संजीवनी ठरत होती. त्यातच ते दोघेही जबरदस्त फॉर्ममध्ये असल्यास विरोधी गोलंदाजीची ते अक्षरश: पीसे काढतात. त्यांच्या दमदार सलामीच्या पायावर मधली फळी भारतीय विजयाची इमारत उभारत असते. गौतम गंभीर सद्या त्याच्या सर्वोत्कृष्ट फॉर्ममध्ये नाही, त्यातच सेहवागची अनुपस्थिती भारतास चांगलीच अकडत आहे.


भारतीय गोलंदाजीची प्रमुख धुरा आणि विरोधकांना आपल्या धारदार मार्‍याने नामोहराम करून विजयश्री खेचण्याची क्षमता असलेला झहीर खानही सद्या दुखापतीच्या फेर्‍यात अडकला आहे. त्याच्या अपुपस्थितीने भारतीय मार्‍यातील हवाच काढून टाकली आहे. यामुळे प्रतिस्पर्धी फलंदाज हावी होऊन फलंदाजी करतात. केव्हिन पीटरसनचे लॉर्ड्समधील द्विशतक त्याचेच द्योतक आहे. अन्यथा इंग्लिश फलंदाज आपल्याविरूद्ध धावांचा डोंगर उभारू शकले नसते आणि आपली फलंदाजी त्या डोंगरखाली अक्षरश: दबून मानहानिकारक पराभवास सामोरे जावे लागले नसते.
केव्हिन पीटरसनचे लॉर्ड्समधील द्विशतक त्याचेच द्योतक आहे. अन्यथा इंग्लिश फलंदाज आपल्याविरूद्ध धावांचा डोंगर उभारू शकले नसते आणि आपली फलंदाजी त्या डोंगरखाली अक्षरश: दबून मानहानिकारक पराभवास सामोरे जावे लागले नसते.


भारतीय संघव्यवस्थापनास भविष्यावर नजर ठेवून धोरणात्मक निर्णय घ्यावे लागतील. फिरकी गोलंदाजांची दुसरी फळी कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज करावी लागेल. फक्त हरभजनसारख्या निष्प्रभ मार्‍यावर विसंबून राहणे त्यांना पराभवाची धुळ चाखू शकते. भारतीय क्रिकेटच्या उज्वल भविष्यासाठी काही धाडसी निर्णयही घ्यावे लागतील.

इंग्लंडने लॉर्ड्स कसोटीत सर्वच विभागात जबरदस्त कामगिरी करत दंड थोपटले आहे. भारताकडून कसोटी क्रिकेटमधील बादशाही काढून घ्यायचीच या इराद्याने ते पेटले आहेत. त्यांच्या संघात सद्या तशी क्षमताही आहे आणि टेस्टमध्ये नंबर एकचा संघ बनण्याची त्यांच्यासाठी ही नामी संधी चालून आली आहे. शत्रू गाफील असताना चालून जाऊन कोंडीत पकडणे हा युद्धशास्त्राचा नियमच आहे. इंग्लंडनेही आपणास सद्या गाफील अवस्थेतच पकडले आहे. या कोंडीतून बाहे
टेस्टमध्ये नंबर एकचा संघ बनण्याची त्यांच्यासाठी ही नामी संधी चालून आली आहे. शत्रू गाफील असताना चालून जाऊन कोंडीत पकडणे हा युद्धशास्त्राचा नियमच आहे. इंग्लंडनेही आपणास सद्या गाफील अवस्थेतच पकडले आहे.
र पडणे म्हणजे चक्रव्युह भेदण्यासारखेच आहे. चक्रव्युह भेदता येत नाही असे नाही मात्र त्यासाठी तसे योद्धे असावे लागतात. मात्र टिम इंडीयाची सद्याची अवस्था पाहिल्यास हे कठिण वाटते. तमाम युद्धशास्त्रात पारंगत योद्धे असल्याशिवाय चक्रव्युह भेदता येत नाही, हे आपणांस माहितच आहे. टिम इंडीयाचे योद्धे तर तुंबळ युद्ध पेटण्याअगोदरच घायाळ झाले आहेत. त्यांनी लढण्याअगोदरच शस्त्र खाली टाकल्याचे आपण लॉर्ड्स कसोटीत पाहिलेच आहे. भारतीय क्रिकेट चाहत्यांना आपण हरल्याचे दु:ख नाही तर दु:ख आहे ते आपले योद्धे लढलेच नाही याचे, त्यांनी लढण्याअगोदरच पराभव स्विकारल्याचे, रणांगणावर शरणागत मानसिकता दाखवल्याचे.


भारतीय क्रिकेट संघाने दोन वर्षांच्या अथक परिश्रमानंतर डिसेंबर २००९ मध्ये 'टेस्ट मध्ये बेस्ट' ठरण्याचा बहुमान प्राप्त केला होता. यामध्ये विरेंद्र सेहवाग, झहीर खान, हरभजन सिंह, सचिन, राहूल व गंभीरचा महत्त्वपूर्ण वाटा होता. मात्र यकाळात भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा सेहवाग सद्या टिममध्यनाही आणि त्याची कमी चांगलीच महागात पडत आहे. अवघ्या दोन वर्षातच कष्टाने कमावलेले साम्राज्य पतन होण्याचा धोका निर्माण झाला आहे. भारतीय शिलेदारांस निग्रही बाण्याने लढावे लागेल, तरच साम्राज्य अबाधित राहिल.
डिसेंबर २००९ मध्ये 'टेस्ट मध्ये बेस्ट' ठरण्याचा बहुमान प्राप्त केला होता. यामध्ये विरेंद्र सेहवाग, झहीर खान, हरभजन सिंह, सचिन, राहूल व गंभीरचा महत्त्वपूर्ण वाटा होता. मात्र या काळात भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा सेहवाग सद्या टिममध्ये नाही

टिम इंडीयाचा नंबर वनचा प्रवास चांगलाच रोमांचक राहिला आहे. ईडन गार्डनवरील ऑस्ट्रेलियाविरूद्धचा फॉलोऑननंतरचा अविस्मरणीय विजय, २००७ मधील इंग्लंडविरूद्धचा नॉटींघम येथील ७ गड्यांचा विजय, हॅमिल्टन येथील न्यूझीलँडविरूद्धचा ३३ वर्षांनंतरचा विजय, ऑस्ट्रेलियाविरूद्धचा ऐडलेड येथील डोळ्यांचे पारणे फेडणारा विजय हे या प्रवासातील महत्त्वपूर्ण पाडाव होत. टिम इंडीयाचा हा रोमांचक प्रवास पाहिल्यानंतर भारतास टेस्टमध्ये नंबर वनचा किताब सहजासहजी मिळाले
टिम इंडीयाचा हा रोमांचक प्रवास पाहिल्यानंतर भारतास टेस्टमध्ये नंबर वनचा किताब सहजासहजी मिळालेला नाही, तर तो त्यांनी अथक परिश्रम आणि रणांगणावर शत्रूंना सळो की पळो करून मिळवल्याचे सिद्ध होते.
ला नाही, तर तो त्यांनी अथक परिश्रम आणि रणांगणावर शत्रूंना सळो की पळो करून मिळवल्याचे सिद्ध होते. त्यांनी मैदान गाजवून हा बहुमान मिळवला आहे, या स्मृती जागृत होतात आणि यामुळेच कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय साम्राज्यास कुणी सहजासहवी हिरावू शकणार नाही, याचा विश्वास वाटतो. टेस्ट मधील भारतीय साम्राज्यावर आपल्या योद्धयांच्या शौर्याचा सूर्य सतत तळपत राहिल, याची मनोमन खात्री वाटते फक्त त्यासाठी परत एकदा तसे झुंजावे लागेल!