मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. क्रिकेट मराठी
  4. »
  5. क्रिकेट लेख
Written By वेबदुनिया|

नदालकडून फेडरर पराभूत

WD
वर्षभरानंतर रॉजर फेडररविरुद्ध रंगलेल्या झुंजीत राफेल नदालने 6-4 आणि 6-2 अशी सहज बाजी मारली. याविजयाबरोबरच नदालने इंडियाना वेल्स ओपन टेनिस स्पर्धेत उपांत्य फेरीत प्रवेश केला.

फेडरर माझ्याविरुद्ध 100 टक्के क्षमतेने खेळला असे वाटत नव्हते, अशी प्रतिक्रिया नदालने लढतीनंतर व्यक्त केली. गेल्या वर्षी याच स्पर्धेत फेडररने नदालला सेमीफायनलमध्ये पराभूत केले होते. या दोन दिग्गजांदरम्यान आतापर्यंत 29 लढती झाल्या असून नदालचा हा 19 वा विजय ठरला. फेडररने 10 जिंकल्या आहेत. जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानावर असलेल्या नदालने प्रदीर्घ दुखापतीनंतर गेल्या महिन्यात कमबॅक केला होता. सेमीफायनलमध्ये नदालचा मुकाबला झेक प्रजासत्ताकाच्या तॉमस बर्डिच‍जविरुद्ध होणार आहे.