Last Modified: नवी दिल्ली , बुधवार, 18 मार्च 2009 (17:12 IST)
डेव्हिस कपचा सामना चेन्नईत
भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान होणारा डेव्हिस कपचा सामना चेन्नईत खेळविला जाणार आहे. चेन्नईच्या नुंगम्बाक्कम टेनिस सेंटर हार्ड कोर्टवर हा सामना होणार आहे.
अखिल भारतीय टेनिस संघ हिरवळ मैदानावर सामने घेण्याची परंपरा तोडण्याच्या तयारीत आहे. याचा फायदा भारताच्या सोमदेव देववर्मन याला होण्याची शक्यता आहे. हे सामने आठ ते 10 मे पर्यंत होणार आहे.