शुक्रवार, 1 नोव्हेंबर 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. क्रीडा वृत्त
Written By वेबदुनिया|

फेडरर, नदाल, त्सोंगाने मारली बाजी

PR
रॉजर फेडररने ब्लॅझ कावसिकवर ६-२,६-१,७-६ अशी मात करून ऑस्ट्रेलियन ओपनच्या तिस-या फेरीत प्रवेश केला. त्याच्याबरोबरच जागतिक क्रमवारीतील अग्रमानांकित रॅफेल नदाल, जो-विल्फ्रेड त्सोंगा तसेच महिला विभागात मारेया शारापोवाने तिसरी फेरी गाठली आहे.

कडक उष्णतेमुळे इनडोअर स्टेडियममध्ये घेतलेल्या सामन्यात रॉजर फेडररने कावसिकविरुद्ध पहिला सेट २६ मिनीटांत जिंकला.त्याने १७ विनर्स लगावले.दुस-या सेटच्या चौथ्या गेममध्ये कावसिकने २ ब्रेकपॉर्इंट वाचवले.त्यानंतर २३ फटक्यांची रॅली झडली. अखेर रॉजरचा फोरहँड बाहेर गेला.स्लोव्हेनियाच्या कावसिकने जोरदार लढत देण्याचा प्रयत्न केला.परंतू रॉजरने दुसरा सेट २८ मिनीटांत जिंकला.तिस-या सेटमध्ये मात्र जोरदार लढत झाली. कावसिकची सव्र्हीस सुधारलेली दिसली.परंतू रॉजरने तिसरा सेट टायब्रेकवर जिंकला.तिस-या फेरीत रॉजरची लढत स्पेनचा ३१ वा सिड फर्नांडो बेर्दास्को किंवा रशियाच्या तेमूराज गॅबाशिव्लीविरुद्ध होईल.

नदालची होकिनाकीसवर मात
नदालने आपल्याच देशाच्या १७ वर्षीय थनासि कोकिनाकीसवर ६-२,६-४,६-२ अशी ११३ मिनीटांत मात केली.नदालने कोकिची सव्र्हीस ५ वेळा भेदली आणि ३ ब्रेकपॉर्इंट्स वाचवले.पुढील फेरीत नदालची गाठ अमेरिकेच्या जॅक सॉक किंवा फ्रान्सच्या गेल मोन्फील्सविरुद्ध पडेल.

त्सोंगाचा विजय
माजी उपविजेता आणि दहावा मानांकित जो-विल्फ्रेड त्सोंगाने बेलुसिवर ७-६,६-४,६-४ असा विजय मिळवून तिस-या फेरीत प्रवेश केला.सामन्यानंतर त्सोंगा म्हणाला, मला इनडोअर वातावरणाचा लाभ मिळाला, हे मी माझे भाग्य समजतो. त्सोंगाने ब्राझिलच्या बेलुसिची सव्र्हीस ३ वेळा तोडली आणि १४ बिनतोड सव्र्हीस मारल्या. हा सामना १३५ मिनीटे चालला. फ्रान्सच्या त्सोंगाने ४७ विनर्स फ्टके लगावले.पुढील फेरीत त्सोंगाची लढत गिलेस सिमोन अथवा मारिन सिलीकविरुद्ध पडेल.