शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: मेलबर्नं , रविवार, 29 जानेवारी 2017 (18:11 IST)

ऑस्ट्रेलिया ओपनमध्ये नडालचा पराभव करून फेडररने बाजी मारली

दोन महारथींचा सामना स्विस स्टार रोजर फेडररने जिंकले. फेडररने वर्षाच्या पहिला ग्रँडस्लँम ऑस्ट्रेलिया ओपनमध्ये स्पेनच्या राफेल नडालला पाचव्या सेटपर्यंत चालत असलेल्या सामन्यात 6-4, 3-6, 6-1, 3-6, 6-3 अशी मात केली आणि ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद पटकावले. फेडररचे या स्पर्धेतील हे पाचवे आणि कारकिर्दीतील 18 वे ग्रँडस्लॅंम विजेतेपद ठरले. उल्लेखनीय म्हणजे  फेडररने 2010 नंतर प्रथमच ऑस्ट्रेलियन ओपनचे आणि 2012 नंतर प्रथमच ग्रँडस्लॅम स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. 
 
तब्बल तीन तास 38 मिनिटे रंगलेल्या आणि अत्यंत चुरशीच्या झालेल्या अंतिम लढतीत फेडररने दमदार सुरुवात करताना पहिला सेट 6-4  अशा फरकाने जिंकला. मात्र नदालने दुसऱ्या सेटमध्ये 6-3 ने बाजी मारत सामन्यात कमबॅक केले. त्यानंतर तिसऱ्या सेटमध्ये फेडररने पुन्हा आपला खेळ उंचावताना हा सेट 6-1 ने जिंकला. मात्र चौथ्या सेटमध्ये नदालने फेडररला मात देत या सेटवर 6-3 ने कब्जा केला. त्यानंतर पाचव्या आणि निर्णायक सेटमध्ये फेडररने जबरदस्त खेळाचे प्रदर्शन घडवले. त्याने  या सेटमध्ये नदालने घेतलेली आघाडी मोडून काढत जोरदार मुसंडी मारली आणि सेट 6-3 ने जिंकत सेटसह ऑस्ट्रेलियन ओपनच्या विजेतेपदावर कब्जा केला.