1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 4 फेब्रुवारी 2023 (13:21 IST)

दिपा कर्माकरवर 21 महिन्यांच्या बंदी

इंटरनॅशनल टेस्टिंग एजन्सीने (ITA) ने भारतीय जिम्नॅस्ट दीपा कर्माकर वर बंदी घातली आहे. आयटीएने हायजेनामाइन प्रतिबंधित पदार्थाची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर तिला अपात्र ठरवत 21 महिन्यांची बंदी घातली आहे. ही बंदी 10 जुलै 2023 पर्यंत कायम राहील.
 
प्रतिबंधित पदार्थ सेवन केल्यामुळे दीपा चर्चेत आली आहे. दीपाच्या चाचणीचे नमुने 11 ऑक्टोबर 2021 रोजी स्पर्धेबाहेर काढण्यात आले. 
 
ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारी दीपा ही पहिली जिम्नॅस्ट होती. 2016 च्या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत दीपाने चौथे स्थान पटकावले होते. याआधी दीपाने 2014 च्या ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेत कांस्यपदक जिंकले होते.