मंगळवार, 12 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: पॅरिस , सोमवार, 5 ऑक्टोबर 2020 (12:09 IST)

फ्रेंच ओपन टेनिस : जोकोविचने फेडररला टाकले मागे

French Open
सर्बियाच्या नोवाक जोकोविचने शनिवारी कोलंबियाच्या डॅनियल इलाही गलान याला सरळ सेटमध्ये 6-0, 6-3, 6-2 ने पराभूत करत फ्रेंच ओपन टेनिसच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.
 
जोकोविचने हा सामना दोन तास आठ ‍मिनिटांमध्ये जिंकला. तर त्याचा हा क्ले कोर्ट ग्रँडस्लॅम फ्रेंचमध्ये 71 वा विजय ठरला. या टुर्नामेंटमध्ये सर्वाधिक सामने जिंकण्याच्या बाबतीत त्याने स्विर्त्झलँडच्या रॉजर फेडररला पिछाडीवर टाकत दुसरे स्थान काबीज केले आहे. जोकोविचने तिसर्या7 फेरीत सातवेळा गलानची सर्व्हिस तोडली. फ्रेंच ओपनमध्ये सर्वाधिक सामने जिंकण्याच्या बाबतीत 12 वेळा विजेता ठरलेल्या स्पेनच्या राफेल नदालचे रेकॉर्ड 96-2 असे असून तो अव्वलस्थानी आहे तर जोकोविचचे रेकॉर्ड 71.14 असे आहे. फेडररची कामगिरी 70-17 अशी आहे.