सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: मेलबर्न , मंगळवार, 4 फेब्रुवारी 2020 (13:20 IST)

शाकाहार, योग व ध्यान जोकोविचच्या तंदुरुस्तीचे रहस्य

आठव्या ऑस्ट्रेलियन ओपनचा किताब जिंकणार्‍या महान टेनिस खेळाडूंच्या यादीत समाविष्ट झालेल्या नोवाक जोकोविचने आपल्या अपराजीत राहण्याचे व तंदुरुस्तीचे श्रेय शाकाहार, योग आणि ध्यान याला दिले आहे.
 
युध्दभूमी असलेल्या बेलग्रादमध्ये जन्मलेल्या सर्बियाच्या या स्टार टेनिस खेळाडूने कोरड्या स्विमींग पूलमध्ये सराव करत टेनिसमध्ये प्रावीण्य मिळविले. विजयानंतर त्याला 14 कोटी डॉलरचे बक्षीस देण्यात आले. आपल्या कारकिर्दीत अनेक चढ-उतार पाहिलेला जोकोविच आता पूर्वीपेक्षा अधिक परिपक्व आणि कसलेला खेळाडू दिसून येतो. गतवर्षी जवळ-जवळ पाच तास चाललेला विम्बल्डनचा अंतिम सामना आणि 2012 मध्ये 5 तास 53 मिनिटे चाललेला ऑस्ट्रेलियन ओपनचा अंतिम सामना त्याने जिंकला आहे. आतापर्यंत 17 ग्रँडस्लॅम जिंकणार्‍या या 32 वर्षीय जोकोविचची नजर रॉजर फेडरर आणि राफेल नदाल यांचा विक्रम मोडण्यावर आहे.
 
जोकोविचची दिनचर्या यशस्वी होऊ इच्छिणार्‍या प्रत्येकासाठी अनुकरणी आहे. तो सूर्योदयापूर्वी आपल्या परिवारासह उठतो. त्यानंतर सूर्योदय झाल्याचे पाहून आपल्या कुटुंबीयांची गळाभेट घेतो. त्यानंतर त्यांच्यासमवेत गाणी गात योग करतो. दोन मुलांचा पिता असलेला जोकोविच पूर्णपणे शाकाहारी आहे.
 
नेटफ्लिक्सची डॉक्युमेंट्री असलेल्या द गेम चेंजर्समध्ये त्याने म्हटले आहे की, मी अपेक्षा व्यक्त करतो की, अन्य खेळाडूंनी शाकाहार अवलंबणसाठी मी त्यांना प्रेरीत करू शकेन. आठवे ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद जिंकल्यांनतर त्याने विजयाचा जल्लोष पार्टीने न करता शहरातील बॉटनिकल गार्डनमध्ये अंजीरच्या झाडावर चढून साजरा केला. त्याने सांगितले की, ब्राझिली अंजीरचे झाड माझा मित्र असून त्याच्यावर चढायला मला खूप आवडते. हे माझे खूपच आवडीचे काम आहे. 
 
पहिल्यांदा 2008 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपदजिंकणार्‍या जोकोविचने 2011 ते 2016 दरम्यान 24 पैकी 11 ग्रँडस्लॅम जिंकले व सात सामन्यांमध्ये अंतिम फेरीपर्यंत मजल मारली. त्यानंतर तो सुमार कामगिरी व दुखापतींनी वेढला गेला. मात्र, 2017 च्या विम्बल्डननंतर त्याला सापडला.
 
यादरम्यान त्याने आध्यात्माची शरण घेत ध्याच्या दीर्घ सत्रांमध्ये सहभाग घेतला. त्यामुळे तो अधिक सहनशील व संतुष्ट झाला.