1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 30 ऑगस्ट 2024 (17:00 IST)

पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताच्या अवनी लेखराने नेमबाजीत सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला

Paralympics 2024
पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताच्या अवनी लेखराने नेमबाजीत सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला आहे. तिने हे सुवर्णपदक महिलांच्या 10 मीटर एअर रायफल स्पर्धेत SH-1 मध्ये जिंकले. पॅरिस पॅरालिम्पिकमधलं भारताचं हे पहिलं पदक आहे आणि तेही सुवर्णपदकच. अवनीला हा विजय एवढ्या सहजासहजी मिळाला नाही हे सांगूया. इथपर्यंत पोहोचण्यासाठी तिला खूप संघर्ष करावा लागला. 

2012 साली अवनी लेखरा वयाच्या अवघ्या 12 व्या वर्षी एका अपघातामुळे तिला अर्धांगवायूचा त्रास झाला आणि तिला चालण्यासाठी व्हीलचेअरची मदत घ्यावी लागली. पण अवनीने हार मानली नाही आणि पुढे जाण्याचा निर्णय घेतला. अपघातानंतर अवघ्या तीन वर्षांनी अवनीने शुटिंगला आपले आयुष्य बनवले आणि अवघ्या पाच वर्षांत अवनीने गोल्डन गर्लचा किताब पटकावला. आता तिने सलग दुसऱ्या पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहासच रचला नाही तर ती भारताची सर्वात यशस्वी नेमबाज बनली.

तिने महिलांच्या 10 मीटर एअर रायफल स्पर्धेत सुवर्ण आणि महिलांच्या 50 मीटर रायफल P-3 SH-1 स्पर्धेत कांस्यपदक जिंकले. एका पॅरालिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी ती भारतातील पहिली महिला खेळाडू ठरली.टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत पदक जिंकून या खेळांमध्ये पदक जिंकणारी ती तिसरी भारतीय महिला ठरली.

पॅरालिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी अवनी ही पहिली भारतीय महिला खेळाडू आहे. या खेळांच्या नेमबाजी स्पर्धेतही त्याने भारताला पहिले पदक मिळवून दिले.
Edited by - Priya Dixit