रँकिंग वाढवण्यापेक्षा जेतेपद जिंकणे महत्त्वाचे - किदाम्बी श्रीकांत
भारताचा स्टार बॅडमिंटनपटू किदाम्बी श्रीकांतने म्हटले आहे की ते आता दुखापतीतून पूर्णपणे सावरले आहे आणि मानांकनापेक्षा अधिक जेतेपदे जिंकण्यासाठी उत्सुक आहे. जागतिक क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर असलेले श्रीकांतला नागपुरात झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेदरम्यान मांडीच्या दुखापतीमुळे दोन स्पर्धांमध्ये पूर्णपणे सहभागी होता आले नाही. पण आता ते पूर्णपणे तंदुरुस्त आहे आणि 13 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या दुबई ओपन सुपर सीरिजमध्ये विजेतेपद मिळविण्यासाठी सज्ज आहे.
या वर्षी चार सुपर सीरिज जेतेपद पटकावणाऱ्या श्रीकांतने पत्रकारांशी बोलताना सांगितले की, मी पहिल्या क्रमांकाचा अजिबात विचार करत नाही. माझ्यासाठी रँकिंगपेक्षा जेतेपद मिळवणे महत्त्वाचे आहे. मी फक्त चांगली कामगिरी करण्याचा विचार करतो आणि रँकिंगचा नाही. जर मी चांगली कामगिरी केली आणि जेतेपद पटकावले तर मी निश्चितपणे नंबर वन होऊ शकेन.
24 वर्षीय श्रीकांत म्हणाले , “गेले सहा-आठ महिने माझ्यासाठी खूप छान राहिले आहेत. या वर्षातील ही शेवटची स्पर्धा असेल ज्यामध्ये मला चांगली कामगिरी करायची आहे. माझी यंदाची कामगिरी उत्तम राहिली आहे. पण मला आगामी काळातही अशीच कामगिरी करायची आहे.