शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 8 नोव्हेंबर 2016 (09:55 IST)

राज्यातील आठ खेळाडूंना शासकीय सेवेत सामावणार

जागतिक पातळीवर देशाचे नाव वेगळ्या टप्प्यावर नेणाऱ्या तसेच महाराष्ट्राचा मराठी ठसा उमटावणाऱ्या तब्बल आठ खेळाडूंना शासकीय सेवेत सामावून घेण्याच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे. यात नाशिकची ‘सावरपाडा एक्सप्रेस’ कविता राऊत आणि राज्यातील क्रीडा क्षेत्रास प्रोत्साहन मिळावे यासाठी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. 
 
त्यानुसार राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांच्या अध्यक्षतेखालील समितीने अशा गुणवंत खेळाडूंबाबत चर्चा केल्यानंतर या समितीने आठ खेळाडूंना त्यांच्या शैक्षणिक व क्रीडाविषयक पात्रतेनुसार शासकीय सेवेत थेट सामावून घेण्याचा प्रस्ताव तयार केला होता. त्यास मुख्यमंत्री फडणवीस आणि क्रीडा मंत्री विनोद तावडे यांनी मान्यता दिली आहे.खेळाडूंच्या शैक्षणिक व क्रीडाविषयक पात्रतेनुसार शासकीय सेवेत थेट सामावून घेण्यात येणार आहे.