मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 31 ऑक्टोबर 2023 (08:58 IST)

Lionel Messi: आठव्यांदा बॅलन डी' ओर पुरस्काराने सन्मानित मेस्सी

Lionel Messi
दिग्गज फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने पुन्हा एकदा प्रतिष्ठेचा बॅलन डी'ओर पुरस्कार जिंकला आहे. मेस्सीला आठव्यांदा बॅलन डी'ओर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. बॅलन डी'ओर पुरस्कार जिंकणारा मेस्सी पहिला SLS खेळाडू ठरला आहे. इंटर मियामीचे मालक आणि फुटबॉल लिजेंड डेव्हिड बेकहॅम यांनी मेस्सीला हा सन्मान दिला आहे. लिओनेल मेस्सीने यापूर्वी 2009, 2010, 2011, 2012, 2015, 2019 आणि 2021 मध्ये बॅलन डी'ओर पुरस्कार जिंकला आहे.
 
बॅलन डी'ओर हा फुटबॉलचा सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार आहे, जो वैयक्तिक खेळाडूला दिला जाणारा सन्मान आहे. फुटबॉल क्लब आणि राष्ट्रीय संघातील खेळाडूला त्याच्या सर्वोत्तम कामगिरीच्या आधारावर दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो.
जगातील सर्वोत्कृष्ट पुरुष आणि महिला फुटबॉलपटूच यासाठी पात्र आहेत.
1956 पासून दरवर्षी पुरुषांना त्यांच्या सर्वोत्तम कामगिरीबद्दल या पुरस्काराने सन्मानित केले जाते. 
2018 पासून सर्वोत्कृष्ट महिला खेळाडूंना बॅलन डी ओर देण्याची परंपरा सुरू झाली आहे.
2020 मध्ये कोविड महामारीमुळे हा पुरस्कार देता आला नाही.
 
 


Edited by - Priya Dixit