लग्नाच्या 20 वर्षांनंतर मेरी कोमचा घटस्फोट होणार?
बॉक्सिंग स्टार असलेल्या मेरी कोमच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित काही बातम्या समोर आल्या आहेत. तिने तिच्या पती सोबतचे 20 वर्षाचे नाते संपुष्टात आणल्याचा बातम्या समोर येत आहे.
बॉक्सिंग सुपरस्टार मेरी कोमच्या वैवाहिक जीवनाशी संबंधित बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्या बातमीनुसार, मेरी कोम आणि तिच्या पतीने एकमेकांना घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला आहे. घटस्फोट घेण्यामागील कारण म्हणजे वैवाहिक जीवनातील दीर्घकाळ चालणाऱ्या समस्या असणे.
मेरी कोम या गेल्या 4 वर्षांपासून त्यांच्या पतीपासून वेगळे राहत असून सिंगल पालक म्हणून तिच्या मुलांचे संगोपन करत आहे. त्यांच्या वैवाहिक जीवनातील मतभेदांमुळे त्या पतीपासून वेगळ्या राहत आहे. जेणे करून त्यांचे नाते सुधारतील. परंतु नाते सुधारण्याऐवजी आणखी बिघडले आहे. मेरी कोम आणि तिच्या पतीमधील गैरसमजामागील कारण राजकीय आहे.मेरी कोम या राज्यसभेच्या माजी सदस्या देखील होत्या. निवडणुकीनंतर त्यांच्या मध्ये दुरावा निर्माण झाला. जो वाढत गेला.
मेरी कोम यांचे लग्न 2005 मध्ये फ़ुटबाँलपटू के.ऑनलर कॉम यांच्याशी लग्न केलं. त्यांना दोन जुळे मुले झाले. नंतर 2013 मध्ये त्यांनी पुन्हा एका मुलाला जन्म दिला.
नंतर तिला मुलीची हाऊस असल्याने तिने 2018 मध्ये मेरिलियन नावाची मुलगी दत्तक घेतली.
चार वर्षे एकत्र राहिल्यानंतर, हे आनंदी कुटुंब 2022 पासून विभक्त झाले असून आता त्यांचे नाते संपुष्टात येत आहे.
Edited By - Priya Dixit