शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Updated : गुरूवार, 10 नोव्हेंबर 2016 (16:49 IST)

येत्या जानेवारीत राष्ट्रीय ‘नाशिक पेलेटॉन – २०१७’ चे आयोजन

नाशिक सायकलिस्ट असोसिएशनच्या वतीने ‘नाशिक पेलेटॉन २०१७’ ही राष्ट्रीय पातळीवरील सायकल स्पर्धा ७ व ८ जानेवारी आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचे हे चौथे वर्ष असून संपूर्ण भारतातून स्पर्धक सहभागी होत असतात. नाशिकमध्ये विविध केंद्रांवर स्पर्धकांसाठी नोंदणी अर्ज उपलब्ध असून स्पर्धक आॅनलाईन नोंदणीही करता येणार आहे. 
 
या स्पर्धेत दीर्घपल्ल्याची (१५० किमी) नाशिक जिल्ह्यात पसरलेल्या सह्याद्रीच्या पर्वत रांगांच्या अवघड घाटवळणांवरून नाशिक पेलेटॉनचे स्पर्धक मार्गक्रमण करतील. १८ ते ४० वर्षातील महिला व पुरुष गट तसेच ४० वर्षावरील गटासाठी १५० किमीची नाशिक - कसारा – घोटी – कावनई – त्र्यंबकेश्वर – नाशिक अशा मार्गावर स्पर्धा होईल. तर ५० की.मी साठी नाशिक – त्र्यंबकेश्वर – नाशिक अशा मार्गावर हि स्पर्धा होणार आहे. बक्षिसांची एकूण रक्कम १० लाख रुपये आहे. तसेच १४ ते १८ वयोगटातील मुलांकरिता १५ की.मी आणि हौशी लोकांसाठी (सगळ्या स्पर्धकांसाठी) १५ किमीची ‘जॉय राईड’ देखील आयोजित करण्यात आली आहे. तर घाटाचे अंतर कमीत कमी वेळात सर्वप्रथम पार करणाऱ्या स्पर्धकाला ‘घाटाचा राजा’ हा मानाचा किताबही दिला जाणार आहे.
 
या स्पर्धेसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन (nashikcyclists.com) देखील सुरु आहे. फॉर्म भरण्याची अंतिम तारीख ५ जानेवारी २०१७ पर्यंत आहे. अधिक माहितीसाठी nashikcyclists.com या आमच्या संकेतस्थळाला भेट द्यावी.
 
अशी होईल स्पर्धा :
१५० किलोमीटर सायकल स्पर्धा : नाशिक-कसारा–घोटी–कावनई–त्र्यंबकेश्वर–नाशिक
* (१८ ते ४० वयोगट) आणि * (४० वर्षापुढील गट)
 
५०किलोमीटर सायकल स्पर्धा : नाशिक – त्र्यंबक – नाशिक
* १८ ते ४० वयोगट (पुरुष आणि महिला)
* ४० वर्षांपुढील वयोगट (पुरुष आणि महिला)
  
१५ किलोमीटर सायकल स्पर्धा :
१४ ते १८ वयोगट (मुले आणि मुली)