testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

विम्बल्डन : राफेल नदाल पराभूत

nadal
Last Modified बुधवार, 12 जुलै 2017 (11:33 IST)
विम्बल्डन टेनिस
स्पर्धेत
काल झालेल्या चौथ्या फेरीच्या सामन्यांमध्ये एक धक्कादायक निकाल पाहायला मिळाला. स्पेनच्या राफेल नदालला चौथ्या फेरीत पराभवाचा धक्का बसलेला आहे.
लग्जमबर्गच्या गिल्स मुलरने नदालला ६-३, ६-४, ३-६, ४-६, १५-१३ अशी कडवी झुंज देत पराभूत केलं. हा सामना तब्बल ४ तास आणि ४८ मिनीटं चालला.
जागतिक क्रमवारीत मुलर हा २६ व्या क्रमांकावर आहे. या पराभवानंतर राफेल नदालची विम्बल्डन स्पर्धेतली खराब कामगिरी अद्यापही कायम आहे.

नदालवर मिळवलेल्या या विजयामुळे मुलरने उपांत्यपूर्व फेरीत आपला प्रवेश
नक्की केला आहे. नदालविरुद्ध मुलरचा सामना हा इतका रंगला की शेवटचा सेट तब्बल २ तास १५ मिनीटांनी संपला. सामना संपल्यानंतर नदालला
चेहऱ्यावरील निराशा लपवता आली नाही.

पहिले दोन सेट गमावल्यानंतर नदालने सामन्यात चांगलं पुनरागमन केलं. तिसरा आणि चौथा सेट आपल्या नावे केल्यानंतरही अखेरच्या सेटमध्ये नदालने मुलरला चांगली टक्कर दिली. अखेरच्या सेटमध्येही नदालने मॅच पॉईंट वाचवत हा सामना रंगतदार करण्याचा प्रयत्न केला. मात्र मुलरच्या जबरदस्त अशा खेळासमोर नदालाचा टिकाव लागला नाही. १५-१३ अशा फरकाने चौथा सेट जिंकत मुलरने तब्बल पाच तास चाललेला हा सामना जिंकून उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली.


यावर अधिक वाचा :