testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

सानियाचा फोटो शेअर करून रामूने ओढवला वाद

कोणत्याही मार्गाने वाद निर्माण करून चर्चेत राहिल्या शिवाय काही मंडळींना चैन पडत नाही. अशाच उठसूट वाद निर्माण करणार्‍यांमध्ये बॉलीवूडमधील प्रसिद्ध निर्माता, दिग्दर्शक रामगोपाल वर्मा याचादेखील समावेश आहे. तो कधी प्रक्षोभक वक्तव्य कधी आक्षेपार्ह लेखन करून सतत वाद ओढवून घेत असतो. रामूने आता भारताची टेनिस सुंदरी सानिया मिर्झाचा एका फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करून नव्या वादाला तोंड फोडले आहे. सानियाचा टेनिस खेळत असतानाचा एक फोयो रामूने आपल्या अकाऊंटवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये सामन्यादरम्यान फटका खेळत असलेल्या सानियाचे अंतर्वस्त्र दिसत आहे.

या छायाचित्राला दिलेल्या कॅप्शनमध्ये रामू म्हणतो, कुण्या एका तरुणीने सांगितले की माझ्या मुलीला सनी लिओन बनायचे आहे. त्यावरून मला एक गोष्ट आठवली. एक मुलगी टेनिस खूप चांगले खेळायची पण हा खेळ खेळण्यासाठी स्कर्ट्स घालावा लागत असल्याने वयात आल्यावर तिच्या वडिलांनी तिला खेळण्यास मनाई केली. रामूला या ‍छायाचित्रकातून काय सांगायचे ते कळले नाही.


यावर अधिक वाचा :