शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: मेलबर्न , सोमवार, 14 जानेवारी 2019 (13:05 IST)

ऑस्ट्रेलियन खुले टेनिस : आजपासून मातब्बर खेळाडूंमध्ये लढत

14 जानेवारीपासून नव वर्षातील पहिली ग्रँडस्लॅम ऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा खेळली जात आहे. 
 
टेनिसधील मातब्बर खेळाडू रॉजर फेडरर, नोवाक जोकोविक, राफेल नदाल, अँडी मरे हे या स्पर्धेत खेळत आहेत. 
 
टेनिस क्रीडा प्रकारातील चार प्रुख ग्रँडस्लॅमपैकी एक म्हणून ओळखल्या जाणार्‍या या प्रतिष्ठित अशा मेलबर्न पार्क येथे रंगणार्‍या या स्पर्धेत रॉजर फेडरर, नोवाक जोकोविक, राफेल नदाल व अँडी मरे या चार मातब्बरांना कदाचित एकेकांविरुद्ध खेळताना पाहण्याची अखेरची संधी न गमवण्यासाठी सर्व टेनिसप्रेमी सरसावले आहेत.
 
साहजिकच पुरुष एकेरीत सर्वांचे विशेष लक्ष असेल ते म्हणजे स्विर्त्झंलडचा गतविजेता फेडरर आणि कारकिर्दीतील अखेरची टेनिस स्पर्धा खेळणार्‍या इंग्लंडचा मरे यांच्यावर 2018 मध्ये फेडररला फक्त एकाच ग्रँडस्लॅम स्पर्धेचे विजेतेपद मिळवता आले होते, मात्र वर्षांच्या सुरुवातीला हॉपमन चषकात विजय मिळवून 37 वर्षीय फेडररने आपण अजूनही रंगात असल्याचे सिद्ध केले. दुसरीकडे दुखापतीने ग्रासलेल्या मरेला गतवर्षी बहुतांश स्पर्धांधून माघार घ्यावी लागली. त्यामुळे 2016 च्या उपविजेत्या मरेला आता कारकिर्दीचा शेवट गोड करण्यासाठी कडवी मेहनत घ्यावी लागणार आहे.
 
महिला एकेरीत गतविजेत्या कॅरोलिन उझनिाकीला प्रथम मानांकित सिमोना हालेपकडून कडवी झुंज मिळू शकते. दालेपने गतवर्षी उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. त्याशिवाय विम्बल्डनचे विजेतेपद मिळवणारी जपानची नाओमी ओसाकादेखील विजेतेपदासाठी प्रबळ दावेदार आहे, तर अनुभवी सेरेना विल्यम्स कारकीर्दीत आठव्यांदा या मानाच्या विजेतेपदाला गवसणी घालण्यासाठी उत्सुक आहे.
 
फेडरर आणि जोकोविक हे सातववेळी ही स्पर्धा जिंकणच्या प्रयत्नात आहेत. अव्वल क्रमाकांचा जोकोविक आणि तिसर्‍या स्थानावरील फेडरर यांच्या पुढे युवा अलेक्झांडर   इलेरेव्ह यांचे आव्हान असणार आहे. अलेक्झांडर हा चौथ्यास्थानी आहे. जगात दुसर्‍यास्थानी असलेल्या नदालपुढे तंदुरुस्तीचे आव्हान असणार आहे. या स्पर्धेपूर्वीच ब्रिस्बेन सराव स्पर्धेतून त्याने माघार घेतली होती. 
 
पुरुषएकेरीत जोकोविक, फेडरर, नदाल, मरे यांना ड्रॉ सोपा जाणार नाही त्यांना नव्या मदाच्या स्पर्धकाना तोंड द्यावे लागणार आहे.