Widgets Magazine
Widgets Magazine

जागतिक बॅडमिंटन स्पर्धा : सिंधू, साई प्रणीथ यांची विजयी सलामी

ग्लासगो| Last Modified बुधवार, 23 ऑगस्ट 2017 (11:34 IST)
भारताची ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती महिला बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू आणि सिंगापूर ओपन विजेता पुरुष खेळाडू बी. साई प्रणीथ यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करताना जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत विजयी सलामी दिली. तसेच प्रणव चोप्रा व सिक्‍की रेड्डी यांनीही मिश्र दुहेरीत दुसऱ्या फेरीत धडक मारली. त्याआधी विजेती ऋतुपर्णा दासनेही महिला एकेरीत विजयी सलामी दिली.
Widgets Magazine
चतुर्थ मानांकित सिंधूने कोरियाच्या किम हयो मिन्ह हिच्यावर 21-16, 21-14 असा 49 मिनिटांच्या झुंजीनंतर विजय मिळविताना महिला दुहेरीची दुसरी फेरी गाठली. तसेच साई प्रणीथनेही हॉंगकॉंगच्या वेई नानचे आव्हान 21-18, 21-17 असे 48 मिनिटांच्या लढतीनंतचर संपुष्टात आणताना पुरुष एकेरीची दुसरी फेरी गाठली.

प्रणव चोप्रा आणि सिक्‍की रेड्डी या 15व्या मानांकित जोडीने भारताची प्राजक्‍ता सावंत आणि मलेशियाचा योगेंद्रन कृष्णन या जोडीवर 21-12, 21-19 अशी मात करताना मिश्र दुहेरीत विजयी सलामी दिली. मात्र सुमीत रेड्डी व अश्‍विनी पोनप्पा या सय्यद मोदी ग्रां प्री स्पर्धेतील उपविजेत्या जोडीला वांग लिल्यू व हुआंग डोंगपिंग या 13व्या मानांकित चिनी जोडीकडून 17-21, 21-18, 5-21 असा पराभव पत्करावा लागला. तसेच सात्विकसाईराज रॅंकिरेड्डी व व मनीषा या जोडीलाही मिश्र दुहेरीत पहिल्याच फेरीत पराभव पत्करावा लागला.

Widgets Magazine

यावर अधिक वाचा :