Widgets Magazine

प्रणितला सिंगापूर ओपनचे विजेतेपद

सिंगापूर सीरीजमध्ये भारतीय बॅडमिंटनपटू साई प्रणितला विजेतेपद, तर किदम्बी श्रीकांतला उपविजेतेपद मिळाले.
भारताच्या बी. साई प्रणितनं भारताच्याच किदम्बी श्रीकांतचं कडवं आव्हान 17-21, 21-17, 21-12 असं मोडीत काढून सिंगापूर सुपर सीरीजच्या विजेतेपदावर आपलं नाव कोरले .

सुपर सीरीजच्या इतिहासात दोन भारतीय बॅडमिंटनपटूंच फायनलमध्ये आमनेसामने येण्याची ही पहिलीच वेळ होती. याआधी चीन, इंडोनेशिया आणि डेन्मार्क या देशांचेच बॅडमिंटनवीर फायनलमध्ये खेळल्याची उदाहरणं आहेत.


यावर अधिक वाचा :