Widgets Magazine
Widgets Magazine

युकी भांब्रीची उपांत्यपूर्व फेरीत धडक

नवी दिल्ली, शनिवार, 5 ऑगस्ट 2017 (13:20 IST)

जागतिक क्रमवारीत 200व्या स्थानी असलेल्या भारताच्या टेनिसपटू युकी भांब्रीने सिटी ओपन टेनिस स्पर्धेतील शानदार प्रदर्शन कायम ठेवत उपान्त्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. युकी भांब्रीने सर्वश्रेष्ठ प्रदर्शन करत उप उपान्त्यपूर्व फेरीत ग्युदो पेल्ला याला पराभूत केले.
 
सहाव्या मानांकित फ्रान्सच्या मोनफिल्सला पराभूत करत उलटफेर करणाऱ्या युकी भांब्रीने अर्जेटिनाच्या ग्युदो पेल्ला याच्या तीन सेटपर्यंत झालेल्या संघर्षपूर्ण सामन्यात पराभव केला. हा सामना 6-7(5), 6-3, 6-1 असा जिंकत त्याने अंतिम आठमध्ये स्थान निश्‍चित केले आहे.
 
एटीपी स्पर्धेतील मुख्य फेरीत प्रथमच युकीने सलग तिन्ही सामने जिंकले आहे. युकीचा आता उपान्त्य फेरीत दक्षिण आफ्रिकाच्या केव्हिन अँडरसन याच्याशी लढत होणार आहे. अँडरसनने अन्य एका सामन्यात अग्रमांनाकित डोमॉनिक थिएम याचा 6-3, 6-7, 7-6 असा पराभव करत स्पर्धेत आणखी एक रोमांचिक विजय मिळविला. त्याने सुमारे तीन तास लढत देत हा सामना जिंकला.
 Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

खेळ मराठी

news

नेयमारची बार्सिलोनामधून विदाई

लिओनेल मेस्सी, लुईस सुआरेझ आणि नेयमार या बार्सिलोना क्लबच्या प्रमुख आक्रमणपटूंची फळी ...

news

सरदार सिंह याची खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस

भारतीय हॉकी संघाचा माजी कर्णधार सरदार सिंह याची राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस ...

news

फेडरर प्रथमच खेळणार सहा वर्षानंतर मांट्रियल टुनामेंट

मागील महिन्यात झालेल्या विम्बल्डन स्पर्धेत विक्रमी 19वे ग्रॅड स्लॅम जिंकणारा रॉजर फेडरर ...

news

2024चे ऑलिम्पिक पॅरिसमध्ये होणार

2020 सालचा ऑलिम्पिक खेळ टोकियोमध्ये खेळले जाणार आहे. त्यानंतर आता 2024 आणि 2028चे ...

Widgets Magazine