Widgets Magazine
Widgets Magazine

फेडरर विंवल्डनसाठी सज्ज!

Last Modified मंगळवार, 27 जून 2017 (11:35 IST)

स्वित्झर्लंडचा पाचवा मानांकित टेनिसपटू रॉजर फेडररने येथे हॅले खुल्या पुरूषांच्या स्पर्धेत विक्रमी नवव्यांदा एकेरीचे अजिंक्यपद पटकाविले. अंतिम सामन्यात फेडररने जर्मनीच्या अॅलेक्सझांडेर व्हेरेव्हचा 6-1, 6-4 अशा सेटस्मध्ये पराभव केला.
Widgets Magazine
35 वर्षीय फेडररने आपल्या वैयक्तिक टेनिस कारकिर्दीत 18 ग्रॅण्हस्लॅम अजिंक्यपदे मिळविले असून त्याने हॅलेतील ही स्पर्धा विक्रमी नऊवेळा जिंकली आहे. फेडरर आता 3 जुलैपासून खेळविल्या जाणार्‍या विंबल्डन ग्रॅण्हस्लॅक स्पर्धेसाठी सज्ज झाला आहे. फेडररने अंतिम सामन्यात पहिला सेट 24 मिनिटात जिंकला. गेल्यावर्षी या स्पर्धेत व्हेरेव्हने उपांत्य सामन्यात फेडररला पराभूत केले होते.

Widgets Magazine

यावर अधिक वाचा :