सोमवार, 10 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 26 जुलै 2021 (14:42 IST)

Tokyo Olympics 2020:मीराबाई चानूच्या नावी रौप्यपदकाच्या बदल्यात सुवर्ण पदकाची नोंद होऊ शकते

Tokyo Olympics 2020: Mirabai Chanu could win gold medal in exchange for silver Sports News In Marathi Webdunia Marathi
जपानची राजधानी टोकियो येथे खेळल्या जाणार्‍या ऑलिम्पिक स्पर्धेच्या दुसर्‍या दिवशी भारताची स्टार महिला वेटलिफ्टर मीराबाई चानू हिने रौप्यपदक जिंकले.वेटलिफ्टिंगमधील पदकांचा 21 वर्षाचा दुष्काळ तिने संपविला आणि रौप्यपदक जिंकून देशाचे खातेही उघडले. हे पदक तिने 49 किलो गटात मिळवले. या स्पर्धेत चीनच्या हौ झीहुईने सुवर्णपदक जिंकले.आता अशी बातमी समोर येत आहे की झीहुईची डोपिंग टेस्ट करण्यात येईल.अशा परिस्थितीत जर ती यात अपयशी ठरली तर सुवर्ण पदक चानूच्या पदरी येईल.
 
एएनआयच्या म्हणण्यानुसार, 'चिनी वेटलिफ्टरला सध्या जपानमध्ये राहण्यास सांगण्यात आले असून आता तिची चाचणी घेण्यात येणार आहे.' झीहुईने एकूण 210 किलो (94 किलो + 116 किलो) उचलून सुवर्णपदक जिंकले. इंडोनेशियातील आयशा विंडी केंटिकाने एकूण 194 किलो (84 किलो + 110 किलो) वजन उचलून कांस्यपदक जिंकले. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या नियमांनुसार, जर सुवर्ण जिंकणारा खेळाडू डोप टेस्टला अपयशी ठरला तर रौप्य पदकाच्या विजेत्याच्या नावावर सुवर्ण पदकाची नोंद होईल.
 
भारताच्या ऑलिम्पिक इतिहासात 21 वर्षानंतर पदक मिळाले. चानूपूर्वी कर्णधार मल्लेश्वरीने सिडनी ऑलिम्पिक 2000 मध्ये वेटलिफ्टिंगमध्ये कांस्यपदक जिंकले होते. त्यानंतर, 21 वर्षे,भारत या स्पर्धेत पदकासाठी झुरत होता. मीराबाईने सुवर्णपदक जिंकल्यानंतर टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक मिळवणारी वेटलिफ्टर मीराबाई चानू यांना राज्य सरकार एक कोटी रुपयांचे पारितोषिक देईल,अशी घोषणा मणिपूरचे मुख्यमंत्री एन बीरेन सिंह यांनी केली.