बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: रविवार, 25 जुलै 2021 (12:47 IST)

कुस्ती : प्रिया मलिक ने वर्ल्ड कॅडेट रेसलिंग चॅम्पियनशिप मध्ये सुवर्ण पदक जिंकले

वर्ल्ड कॅडेट रेसलिंग चॅम्पियनशिपमध्ये भारताने मोठे यश संपादन केले आहे.हंगरी येथे होणाऱ्या या चॅम्पियनशिप मध्ये भारताची महिला खेळाडू प्रिया मलिक हिने महिलांच्या 75  किलो वजनाच्या गटातील सुवर्णपदक जिंकले. प्रियाने बेलारूस कुस्तीपटूचा 5-0 असा पराभव करून जागतिक कॅडेट कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले.प्रियाने 2019 मद्ये पुण्यात खेलो इंडिया मध्ये सुवर्ण पदक, 2019 मध्ये दिल्लीत 17 व्या स्कूल गेम्स मध्ये सुवर्ण पदक आणि 2020 मध्ये पटना येथे राष्ट्रीय कॅडेट चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण पदक जिंकले होते.प्रिया मलिक ने 2020 मध्ये आयोजित राष्ट्रीय स्कूल गेम्समध्ये सुवर्ण पदक जिंकले.
 
मीराबाई चानू यांनी शनिवारीच टोकियो ऑलम्पिक 2020 मद्ये देशासाठी रौप्य पदक जिंकून इतिहास रचला आहे.
प्रिया मलिक च्या यशाने देशाला अभिमान बाळगण्याची संधी मिळाली आहे.प्रियाच्या या यशाबद्दल ट्विटवरून लोकांचे अभिनंदन होत आहे.
प्रिया चौधरी ही भारतसिंग मेमोरियल स्पोर्ट्स स्कूल निडानीची खेळाडू आहे.
 
प्रियाच्या या कारकिर्दीवर हरियाणाचे क्रीडामंत्रींनी तिचे अभिनंदन केले आहे.त्यांनी लिहिले 'हंगरीच्या बुडापेस्ट येथे आयोजित जागतिक कॅडेट कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्या बद्दल महिला कुस्तीपटू प्रिया मलिक हिचे अभिनंदन''
 
तनुला ही यश मिळालं
भारताची आणखी एक युवा कुस्तीपटू तनु देखील विश्वविजेता झाली आहे.ताणू ने तिच्या सामन्यात एकही गुण न गमावता 43 किलो वजन गटात जेतेपद जिंकले.तिने अंतिम सामन्यात बेलारूसच्या वॅलेरिया मिकीसिचचा पराभव केला.वर्षाने 65 किलो वजनी गटात कांस्य पदक जिंकले.