Widgets Magazine

पुरस्कारासाठी बोल्ट, थॉमसन यांच्यात चुरस

Usain-Bolt
मोनॅको| Last Modified शनिवार, 12 नोव्हेंबर 2016 (12:13 IST)
आंतरराष्ट्रीय हौशी अॅथलेटिक फेडरेशनच्या 2016 सालीतील सर्वोत्तम अॅथलिट्स पुरस्कारांच्या कपात केलेल्या यादीमध्ये जमैकाचा युसेन बोल्ट इलेनी थॉमसन, इथिओपियाच्या अल्माझ अयाना यांचा समावेश आहे.

नुकत्याच झालेल्या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत महिलांच्या 10 हजार मी. धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक मिळविणार्‍या इथिओपियाच्या अयानाचा या पुरस्कार यादीत नामांकन झाले आहे. जमैकाचा विश्व विजेता आणि ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता वेगवान धावपटू युसेन बोल्टने आतापर्यंत हा पुरस्कार पाचवेळा मिळविला आहे. त्याने रिओ ऑलिम्पिकमध्ये 100 व 200 मी. धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदके मिळविली आहेत. या दोन्ही प्रकारात त्याने नवा विश्वविक्रम केला असून सलग तीन ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये त्याने ही कामगिरी केली आहे.


यावर अधिक वाचा :