शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. क्रीडा वृत्त
Written By भाषा|
Last Modified: हैदराबाद , गुरूवार, 30 जुलै 2009 (16:22 IST)

साईना, गोपीचंदचे नायकडून अभिनंदन

भारताची स्टार बॅडमिंटन खेळाडू साईना नेहवाल हिला अर्जुन तर तिचे प्रशिक्षक पी.गोपीचंद यांना द्रोणाचार्य पुरस्कार मिळाल्याबद्दल तेलगू देसम पक्षाचे अध्यक्ष चंद्रबाबू नायडू यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

तेलगूमधील दोन चॅम्पियनांना एकाच वेळी क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार मिळाला, हा आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे, असे नायडू यांनी सांगितले. हा पुरस्कार साईनाला अनेक नवीन विजेतेपद मिळविण्यासाठी प्रेरणा देईल, असेही त्यांनी सांगितले.