शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: फुझोऊ (चीन) , सोमवार, 17 नोव्हेंबर 2014 (11:41 IST)

सायनाचे ऐतिहासिक विजेतेपद विक्रम

चायना ओपन सुपर सीरिज प्रीमिअर बॅड‍मिंटन विजेतेपदाच ट्रॉफीसह भारताच्या सायना नेहवालने सहाव्या प्रयत्नात चीनच्या अकाने यामाक्युचीचा महिला एकेरीच अंतिम सामन्यात 21-12, 22-20 असा पराभव करून प्रथमच हे प्रतिष्ठेचे विजेतेपद मिळविले. सुपर सीरिज टूर्नामेंटमध्ये पुरुष आणि महिला एकेरी स्पर्धेत विजय मिळवण्याची ही पहिलीच वेळ आहे. 
 
महिला एकेरीत सायनाने सहाव्या प्रयत्नात चायना ओपन किताबावर आपले नाव कोरले. पहिल्या गेममध्ये सायनाने सुरुवातीला ३-१ अशी आघाडी मिळवली. ही आघाडी कायम ठेवत सायनाने ८-४ अशी बढत मिळवली. तिने चुकीच्या स्ट्रोकमुळे काही गुण गमावले; पण मध्यंतरापर्यंत सायनाने चार गुणांची आघाडी घेतली. त्यानंतर सायनाने तिच्या युवा प्रतिस्पर्धीला चुका करण्यास भाग पाडले. सायनाने १४-७ अशी दमदार आघाडी मिळवली. अकेनीने दुसर्‍या गेममध्ये चांगले प्रदर्शन केले. आपल्या सरळ स्मॅशने अकेनीने सायनाला हैराण केले आणि मध्यंतरापर्यंत ११-९ अशी आघाडी मिळवली. दुसरा गेम अधिक रोमांचक झाला. सायनाने पुनरागमन करत १४-१४ अशी बरोबरी साधली. १८-१८ अशी गुणसंख्या असताना सायनाने नेट शॉटमुळे एक गुण मिळवला; पण त्यानंतर सायनाचा शॉट बाहेर गेला आणि अकेनीने २0-१९ अशी आघाडी घेतली. त्यानंतर मात्र अकेनीचे दोन शॉट बाहेर गेल्यामुळे सायनाच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले.