शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By wd|
Last Modified: पुणे , बुधवार, 9 जुलै 2014 (10:28 IST)

सुरेश कलमाडी पाच वर्षांनी कोर्टात हजर

राष्ट्रकुल घोटाळ्यातील आरोपी आणि पुण्याचे माजी खासदास सुरेश कलमाडी तब्बल पाच वर्षांनी कोर्टात हजर झाले. 2009 च्या लोकसभा निवडणुकीत आचारसंहिता भंग केल्याच्या गुन्ह्यात पोलिसांच्या रेकॉर्डवर सुरेश कलमाडी यांना फरार असे दाखवण्यात आले आहे.

सुरेश कलमाडी मंगळवारी खडकी कोर्टात हजर झाले. कोर्टाने त्यांची 15 हजार रुपयांच्या जामिनावर सुटका केली. 2009 मधील निवडणुकीत कलमाडी पुणे मतदारसंघातून काँग्रेस आघाडीचे अधिकृत उमेदवार होते. त्यांच्या प्रचारासाठी 13 एप्रिल 2009 रोजी संचेती रुग्णालय ते मुळा रोडदरम्यान रॅली काढण्यात आली होती. या रॅलीत नियमापेक्षा जास्त वाहनांचा समावेश केल्यामुळे खडकी पोलिस चौकीत कलमाडी यांच्यासह आमदार विनायक निम्हण, आमदार अनिल भोसले, दीप्ती चौधरी यांच्यासह 150 कार्यकर्त्यांच्या विरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात काही जणांना पोलिसांनी अटकही केली होती. मात्र, कलमाडी यांना पाच वर्षांपासून फरार दाखवण्यात आले होते.