शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. फिल्लमबाजी
Written By वेबदुनिया|

लता दीदींचा 84वा वाढदिवस

WD
भारतरत्न लता दीदी आज 85 व्या वर्षात पदार्पण करत आहेत. वाढत्या वयामुळे लता दीदींनी गाणे कमी केले असले तरी, अजुनही आपण गाण्यास उत्सुक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

लता दीदींनी विविध भाषांमधून अनेक गाणी गायली आहेत. 1942 मध्ये त्यांनी आपल्या संगीत प्रवासाला सुरुवात केली होती. प्रथम मराठी आणि त्यानंतर सहा वर्षातच हिंदी भाषेत लता दीदींनी गाण्‍यास सुरुवात केली.

त्यांचा हा प्रवास इतक्या वेगाने झाला की, पुन्हा कधीही मागे वळून पहाण्‍याची वेळ त्यांच्यावर आली नाही. अनेक दिग्गज संगीतकार, गीतकार तसेच कलाकारांसोबत काम करण्‍याचे भाग्य त्यांना मिळाले.

लता दीदींचा जन्म 28 सप्टेंबर 1929 साली झाला होता. 1974 ते 1991 पर्यंत सर्वाधीक गाणं म्हणण्‍याचा विक्रमही त्यांच्या नावावर असून, त्यांचे नाव ग्रिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवण्‍यात आले आहे.

लता दीदींचा त्याग व संगीतसाठी त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना भारताचा सर्वोच्च पुरस्कार असलेल्या भारतरत्नने गौरवण्‍यात आले आहे.