बुधवार, 22 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. श्री स्वामी समर्थ
Written By
Last Updated : बुधवार, 10 एप्रिल 2024 (15:09 IST)

स्वामी समर्थांचे विचार Swami Samarth Thoughts

उगाची भितोसी भय हे पळू दे
जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे
जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा
नको घाबरू तू असे बाळ त्यांचा
 
विभूती नमन नाम ध्यानादी तिर्थ स्वमीच या पंच प्राणाभृतात
हे तिर्थ घे, आठवी रे प्रचिती न सोडेल स्वामी ज्या घेई हाती
 
जाणीव ठेव शुद्ध मनासी काय व्यर्थ बरळतो, 
कशाची असो भूक त्यासी? तू पुढे काय ठेवितो
 
भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे
 
जो असे कारण सर्व सृष्टीशी, अकारणे जो लावी भक्तीसी
भुलवी मनाच्या दंभ युक्तीसी, असा अविनाशी स्वामी माझा
 
विश्वास ठेव जिथे संपते मर्यादा तुझी, 
तिथून साथ देतो मी
 
तुझ्या अंतरात्म्यात आहे मी तुला हरू देणार नाही
या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही
जी झुंझ तू खेळतो आहेस मनासी 
त्यात तुला मार्ग दाखवत असणार मी. 
भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.
 
ऐहिक जीवनाचे नश्वर स्वरूप जाणावे, 
निष्काम कर्म करावे
 
मोठा अधिकार, संपत्ती यांचा चिरकाल भरवसा मानू नये
 
अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. 
ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल
 
यशस्वी होण्याचा एकच उत्तम पर्याय
दुसऱ्याचं भलं झालेले पाहण्याची ताकद 
आपल्या मनात असली पाहिजे
 
तू कोणाला फसवू नकोस
मी आहे तुझ्या पाठीशी 
तुझी फसवणूक होऊ देणार नाही
 
कोणत्याही सकारात्मक विचारांना कोणतेही विष मारू शकत नाही 
आणि कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचवू शकत नाही
 
प्राण गेला तरीही दुसर्‍या जीवाची हिंसा करू नये
 
ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो, 
पण जर आत्मविश्वास असेल 
तर अशक्य असे काहीच नाही
 
अशक्य ही शक्य करतील स्वामी
 
वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका
पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली 
त्यांचे मोल कधी विसरू नका
 
जर माझे नाव तुझ्या ओठाशी आहे तर घाबरतो कशाला मी सदैव तुझ्या पाठिशी आहे
 
शुद्ध अंतःकरण ठेऊन नाम घेतले तर भगवंताच्या कृपेचा अनुभव येईल. नामानेच अंतरंग शुद्ध बनते. नामानेच मन अंतरंगात प्रवेश करून स्थिर बनते. नामाने काळजी वाटणे नाहीसे होते. मग तळमळही आपोआप जाते.
 
गरिबाला केलेले दान आणि सद्गुरू स्वामींचे मुखात घेतलेले नाव कधी वाया जात नाही.
 
देवाला हे कधीच सांगू नका की तुमच्या अडचणी किती मोठ्या आहेत. 
ते अडचणींना सांगी की तुमचा देव किती मोठा आहे
 
जेथे नाम आहे तिथे मी आहे.
 
नामावर प्रेम करणे म्हणजे माझ्यावर प्रेम करणे होय
 
तुम्ही नाम घेता म्हणून मी तुमच्या मागे - पुढे चालतो
 
जो नुसता नामात राहील त्याला मी अखेरपर्यंत सांभाळेन
 
तू कर्म करत जा, फळाची अपेक्षा न करता
अरे कर्म करणे हे तुझे कर्तव्य
आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणे ही माझी जबाबदारी
 
संकटांना कधी कंटाळायचं नसतं त्यांना सामोरं जायचं असतं
 
कोणी नावे ठेवली तर थांबायचं नसतं,
आपण आपलं चांगलं काम करायचं असतं
 
मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही 
 
उपवास हा नेहमी अन्नाचाच का करावा? 
कधी कधी वाईट विचारांचाही करावा. 
कधीतरी उपवास अहंकाराचा करावा, 
कधी उपवास मीपणाचाही करावा
 
तुझ्या अंतरात्म्यामध्ये आहे मी, तुला हरू देणार नाही. 
या कलियुगात तुला एकटे होऊ देणार नाही
 
जी झुंज तू खेळत आहेस मनाशी त्यात तुला मार्ग दाखवत राहणार आहे मी
 
तुमची खरीखुरी श्रद्धा योग्य ठिकाणी असेल तर पाषाणालाही देवत्व येते
 
समाधानी राहा सुखी व्हाल
भक्ती करा मुक्ती मिळेल
ध्यान करा ज्ञान मिळेल
प्रार्थना करा प्रगती होईल
 
मीपणा सोडा मोठे व्हाल
सहाय्य करा सोबत मिळेल
दान करा धन मिळेल
त्याग करा आत्मानंद मिळेल
श्रम करा सुख मिळेल
 
जिथे सर्व असमर्थ तिथे फक्त स्वामी समर्थ 
 
हृदयातल्या मंदिरात अंधार असेल तर घरातल्या देव्हाऱ्यात दिवा लावून फायदा नसतो
 
निःशंक हो, निर्भय हो, प्रचंड स्वामीबळ पाठीशी, नित्य आहे रे मना। अतर्क्य अवधूत हे स्मर्तुगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी 
 
कृपापूर्ण नेत्र स्वामींचे मायेने भरलेले, भक्तांच्या भेटीसाठी दिसतात आसुसलेले
चेहऱ्यावरचं तेज पाहून भान हरपते, स्वामीचरणी मन सहज दृढ होते 
 
क्षणोक्षणी वाटे स्वामी नामाचा आधार, स्वामी संग धरता कोण राहील निराधार
 
ब्रम्हांडनायक श्री स्वामी समर्थ 
 
दुसऱ्याच्या ताटातलं हिसकावून खाण्यात एखाद्याला आपली शान वाटते. 
तर कुणाला आपल्या ताटातलं दुसऱ्याला भरवण्यात समाधान वाटते
 
विश्वास ठेव…
अरे जो माझा हात पकडतो त्याला कधी कोणाचे पाय पकडण्याची गरज भासत नाही
 
आपल्याला दुःख देणारे जगात कमी नाहीत हे जितकं शक्य आहे तितकंच सत्य हे ही आहे की आपल्याला आईच्या मायेने जवळ घेणारे स्वामींशिवाय कोणीही नाही 
 
मी शरीराने तुम्हाला दिसत नसलो तरीही मी सदैव तुमच्या पाठिशी राहीन – श्री स्वामी समर्थ
 
बंद केले नयन माझे चित्त रूप बघूनी तुझे 
स्वामी तिन्ही जगाचा तू माय बाप आहे या जनाचा 
 
जाणले समर्था तुम्ही माझ्या मनीचे भाव 
म्हणूनच ओठावर असते केवळ स्वामी समर्थांचे नाव
 
ज्या वेळी तू जाशील काळोखात, त्यावेळी तुझी सावलीही सोडेल साथ
तू घाबरू नकोस, स्वामीच पकडतील तुझा हात 
 
गरीबाला केलेले दान आणि सद्गुरू स्वामींचे मुखात घेतलेले नाम कधीच फुकट जात नाही