1. लाईफस्टाईल
  2. »
  3. वेबदुनिया विशेष 08
  4. »
  5. बराक ओबामा
Written By विकास शिरपूरकर|

इतिहासाच्‍या पुनरावृत्तीस सुरूवात...

PR
'इतिहास त्‍याची पुनरावृत्ती स्‍वतःच करतो' असं म्‍हणतात. अमेरिकन नागरिकांना हे वाक्‍य आज शब्‍दशः अनुभवता आले. सुमारे दीडशे वर्षांपूर्वी ज्‍या मार्गावरून व्‍हाईट हाऊसच्‍या दिशेने मार्गक्रमण करीत अब्राहन लिंकन या रुढ अर्थाने सुंदर आणि सशक्‍त नसलेल्‍या व्‍यक्‍तीने इतिहास घडविला होता. आज त्‍याच मार्गाचे अनुसरण करीत बराक ओबामा यांनी व्‍हाईट हाऊसच्‍या दिशने प्रस्‍थान ठेवले आहे.

आपल्‍या राष्‍ट्राध्‍यक्ष पदाची शपथ घेण्‍यापूर्वी फिलाडेल्फिया ते वॉशिंग्‍टन असा रेल्‍वे प्रवास करीत ओबामा व्‍हाईट हाऊसला रवाना झाले आहेत. 1861 मध्‍ये अमेरिकन राष्‍ट्राध्‍यक्ष पदाची शपथ घेण्‍यासाठी लिंकन यांनी याच मार्गाने व्‍हाईट हाऊस गाठले होते. त्‍यांच्‍याच पदचिन्‍हांचा अंगीकार करीत ओबामा यांनी अमेरिकन नागरिकांच्‍या आकांक्षांना पुन्‍हा हात घातला आहे.

शनिवारच्‍या (दि.17) रात्री साडेअकराच्‍या सुमारास जेव्‍हा भारत झोपेच्‍या अधीन होत होता. त्‍यावेळी अमेरिकेच्‍या आकाशात बराक ओबामा नावाचा नवा तारा उदयाला येण्‍याची तयारी करीत होता. आपल्‍या कुटुंबीयांसह सुमारे 220 किलोमीटरचे अंतर पार करीत ओबामा राजधानी वॉशिंग्‍टनला येऊन पोचले आणि एकाच वेळी अमेरिकेची सायंकाळ लखलखली तर भारतातही मैत्रीची नवी पहाट उजाडण्‍याची चिन्‍हे दिसू लागली.
  शनिवारच्‍या (दि.17) रात्री साडेअकराच्‍या सुमारास जेव्‍हा भारत झोपेच्‍या अधीन होत होता. त्‍यावेळी अमेरिकेच्‍या आकाशात बराक ओबामा नावाचा नवा तारा उदयाला येण्‍याची तयारी करीत होता.      

हळूहळू अनेक शहरांमध्‍ये लोकांचे अभिवादन स्‍वीकारत तर काही ठिकाणी सार्वजनिक कार्यक्रमांमध्‍ये सहभागी होत ओबामा राजधानीत येऊन पोचले. येत्‍या 20 रोजी ओबामा राष्‍ट्राध्‍यक्षपदाची सुत्रे स्‍वीकारणार आहेत.

''व्‍हाईट हाऊसच्‍या दिशेने रवाना होताना अमेरिकेतील असंख्‍य सर्वसामान्‍यांच्‍या अपेक्षा आणि आकांक्षा मी सोबत नेत आहे. अमेरिकेत ज्‍या परिवर्तनाची आम्‍हाला गरज आहे, ती निवडणुकीतूनच संपलेली नाही तर ही एक सुरूवात आहे. या आपण सर्वजण मिळून नव्‍या अमेरिकेची निर्मिती करू,'' अशा शब्‍दात आपल्‍या प्रवासाची ओबामा यांनी केली आहे.