1. लाईफस्टाईल
  2. »
  3. वेबदुनिया विशेष 08
  4. »
  5. बराक ओबामा
Written By वेबदुनिया|
Last Modified: वॉशिग्‍टन , बुधवार, 5 नोव्हेंबर 2008 (12:24 IST)

ओबामांवर म.गांधींच्‍या विचारांचा प्रभाव

ND
अमेरिकेचे पहिले कृष्‍णवर्णीय राष्‍ट्राध्‍यक्ष ठरलेले बराक ओबामा यांच्‍यावर भारतीय राष्‍ट्रपिता म.गांधी यांच्‍या विचारांचा मोठा प्रभाव आहे. अमेरिकन सिनेटचे सदस्‍य असलेल्‍या ओबामांच्‍या कार्यालयातही म.गांधीजींचे छायाचित्र लावले आहे. भारतीय संस्‍कृतीबद्दलही ओबामांच्‍या मनात आदर असून त्‍याबाबत एका भारतीय वृत्तपत्राला मुलाखत देताना त्‍यांनी आपले काही भारतीय-अमेरिकन मित्र असल्‍याचे सांगून त्‍यामुळे आपण खूप भाग्यवान असल्‍याचे म्‍हटले होते.

महात्‍मा गांधींनी जगाला शांततेचा आणि अहिंसेचा मार्ग दाखविला. त्‍यांच्‍या या विचारांनी प्रभावित झालेल्‍या ओबामांनी गांधीजींनी भारतीय स्‍वातंत्र्ययुध्‍दाला दिलेल्‍या मार्गदर्शनाचा नेहमीच आदराने उल्‍लेख केला आहे. गांधी जयंतीच्‍या दिवशी दिलेल्‍या एका संदेशात ओबामा म्‍हणाले होते, की ''म.गांधीजींच्‍या विचारांनी जगभरातील अनेक लोकांना दिशा दिली आहे. त्‍यांनी भारतसाठी केलेल्‍या संघर्षातून प्रेरणा घेऊन अनेक अमेरिकन तरुणांनी दमन करणा-यांच्‍या विरोधात आवाज उठविला आहे. मी नेहमीच गांधीजींचे चरित्र एक प्रेरणास्‍त्रोत म्‍हणून पाहिले आहे. कारण गांधीजींनी ज्‍या प्रकारचे परिवर्तन घडवून आणले हे तेव्‍हाच शक्‍य आहे, जेव्‍हा साधारण लोक असाधारण काम करण्‍यासाठी एकत्र येतात.''