1. लाईफस्टाईल
  2. »
  3. वेबदुनिया विशेष 08
  4. »
  5. बराक ओबामा
Written By वार्ता|

बदलाची प्रक्रिया सुरू झाली- ओबामा

आज आपल्याला मिळालेला विजय हा केवळ माझा विजय नाही, तर हा अमेरिकी जनतेचा विजय असल्याचे सांगत आता अमेरिकेत बदलाची प्रक्रिया सुरू झाल्याचे मत अमेरिकेचे नवनिर्वाचीत राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी व्यक्त केले.

मध्यरात्री शिकागोच्या भरगच्च रस्त्यांवर त्यांनी उपस्थित जनतेच्या पुढ्यात निवडणुक जिंकल्या नंतरचे आपले ओजस्वी भाषण केले.

आपल्या निवडणुक प्रचारात दिलेल्या सर्व आश्वासनांची आपण पूर्तता करणार असल्याचे त्यांनी सुरुवातीलाच स्पष्ट केले.

अमेरिकेत काहीही अशक्य नाही हे जनतेने जगाला दाखवून दिल्याचे ते म्हणाले. अमेरिकेत आता बदलाची प्रक्रिया सुरू झाली असून, आपण आता एकजूटीने काम करणे गरजेचे असल्याचे ओबामा म्हणाले.

आपले कोणाशीच वैर नसल्याचे सांगत त्यांनी मेक्कन आणि आपल्या विरोधकांना चपराक दिली.अमेरिका सध्या आर्थिक संकटात अडकली असून, आता आपण सर्वांनी एकजूटीने देशावर येणाऱ्या सर्व संकटांचा सामना करणे गरजेचे असल्याचे ओबामांनी स्पष्ट करताच उपस्थितांनी त्यांना जोरदार प्रतिसाद दिला.