मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कसे कराल
Written By
Last Modified: बुधवार, 3 फेब्रुवारी 2021 (11:31 IST)

Aadhar Card मध्ये घरबसल्या बदल करा

आपल्या आधारकार्डमध्ये काही बदल करू इच्छित असाल तर आता आधार केंद्रावर जाण्याची गरज नाही कारण आपण घरी बसल्याच ऑनलाइन पद्धतीनं बदल करु शकता. ही सुविधा युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने दिली आहे.
 
UIDAI एक हेल्पलाईन तयार केला आहे. 1947 डायल करून तुम्ही आधार सेवा मिळवू शकता. साथीच्या काळात बाहेर पडण्यापेक्षा घरीबसल्या आधारकार्ड संदर्भातील बदल करता येतील. 
 
तसेच आपण 1947 वर डायल करून आपल्या परिसरातील अधिकृत आधार कार्ड केंद्र शोधू शकता. mAadhaar App चा वापर करूनदेखील आधार केंद्राचा पत्ता शोधू शकता, असं ट्वीट UIDAI नं केलं आहे.
 
आधारकार्डवरील नाव, जन्म तारीख, लिंग, पत्ता आणि भाषा या बाबींमध्ये बदल करण्याची गरज भासेल असेल तर आधार केंद्रावर न जाता ऑनलाइन पद्धतीनं घरबसल्या हे काम करता येईल. परंतू काही महत्त्वाचे  बदल जसे कुटुंब प्रमुख किंवा पालक यांची माहिती, बायोमेट्रिक अपडेट, मोबाइल नंबरला आधारशी जोडणं यासाठी आधार सेवा केंद्र किंवा नावनोंदणी केंद्रात जाणं आवश्यक आहे. यासाठी आपण 1947 वर डायल करून आपल्या जवळच्या आधार केंद्राची माहिती जाणून घेऊ शकता किंवा अॅपद्वारे क्रेंद शोधही ऑनलाइन घेता येईल. त्यासाठी राज्य, पिन क्रमांक आणि सर्च बॉक्स असे तीन पर्याय उपलब्ध आहे.
 
आपण वेळ वाचवण्यासाठी आधार सेवा केंद्रावर जाण्यासाठीची ऑनलाइन वेळ घेऊ शकता. यासाठी येथे क्लिक करा. 
 
आता स्थळ निवडा
वेळ निश्चित करण्यासाठी पुढे जा
मोबाइल क्रमांक टाका
कॅप्चा कोड इंटर करा
मोबाइलवर एक ओटीपी मिळेल
ओटीपी सबमिट करा
आधारकार्ड बाबतची माहिती भरा
वैयक्तिक माहिती द्या
आपल्या सोयीची तारीख आणि वेळ निवडा
बुकिंग अपॉईंटमेंट नंबर मिळेल
 
हे मिळाल्यावर आपण आधार सेवा केंद्रात जाऊन आवश्यक बदल करू शकता.